जाहिरात

Pune News: मुंबई विमानतळावर अलर्ट! पुण्यातून 100 विमाने उड्डाण घेणार; नागपुरमध्ये स्थिती काय?

  पुणे विमानतळ सुरळित सुरु असले तरी मुंबई विमानतळावर मात्र अद्याप अलर्ट मोडवर आहे. तसेच नागपूर विमानतळावर सर्व फ्लाईट सुरळीत आहेत. कसलाही बदल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News: मुंबई विमानतळावर अलर्ट! पुण्यातून 100 विमाने उड्डाण घेणार; नागपुरमध्ये स्थिती काय?

रेवती हिंगवे, पुणे: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या वाढत्य तणावादरम्यान देशभरातील महत्त्वाची विमानतळे बंद करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. शनिवारी रात्री दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील विमानतळे, मंदिरे पूर्वपदावर येताना दिसत आहेत. याबाबतच आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून पुणे विमानतळावरुन आज 100 विमाने उड्डाण घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे विमानतळावरील सगळे कामकाज आणि उड्डाणे पूर्वपातळीवर आल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  पुणे विमानतळावरून आज 100 विमाने उड्डाण घेणार आहेत.  पुणे विमानतळ सुरक्षित आणि सध्या परिस्थिती सामान्य असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबतची एक्स माध्यमावरील पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

 विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात असली तरी मात्र प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी आणि इतर सुरक्षतेच्या कारणास्तव पुणे विमानतळावरचे सिक्योरिटी चेक इन आणि इतर सुरक्षा उपययोजनेत वाढ करण्यात आली आहे. जी नियोजित उड्डाणे आहेत ती विमाने पुणे विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. दरम्यान,  पुणे विमानतळ सुरळित सुरु असले तरी मुंबई विमानतळावर मात्र अद्याप अलर्ट मोडवर आहे. तसेच नागपूर विमानतळावर सर्व फ्लाईट सुरळीत आहेत. कसलाही बदल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video )

दरम्यान, पुणे विमानतळावर  शनिवारी रात्री २० मिनिटांसाठी ब्लॅक आऊट घेण्यात आले.  आणीबाणीच्या काळात विमानतळ प्रशासनाची तयारी पाहण्यासाठी म्हणून हे ब्लॅकआऊट ड्रील होते. ड्रील सुरू होताच विमानतळावरील सर्व विद्युतसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. ज्यानंतर विमानतळावरील स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी आणीबाणीच्या वेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना राबवल्या.

विमानतळावर लँड होण्यासाठीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विमानांना साधारण 20 ते 30 मिनिटं हवेतच घिरट्या घालत राहण्यास सांगण्यात आलं आणि यादरम्यानच्या काळात आवश्यक त्या सर्व घोषणा करत प्रवाशांना शांत राहत न घाबरण्याचं आवाहन करण्यात आले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com