देवा राखुंडे, प्रतिनिधी
Ajit Pawar latest News : उत्तरप्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधीवत विसर्जन करण्यात आले.पवार कुटुंबीयांनी आणि उपस्थितांनी या पवित्र भूमीत आत्मिक शांती, श्रद्धा व मोक्षाची अनुभूती घेतली. या भावुक क्षणी दिवंगत अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार कुटुंबीयांसह प्रयागराज येथे उपस्थित होते. पुरोहितांच्या सान्निध्यात अस्थी-कलशाचे पूजन करण्यात आल्यानंतर संगमाच्या व्हीआयपी घाटावर जय पवार यांनी अस्थी विसर्जन केलं. त्यांनी श्रद्धेने पवित्र अस्थी संगमात प्रवाहित करण्यात आल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी परिवारातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेली स्व. अजितदादा पवार यांची देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा' विधीवतरीत्या पार पडली. हरिद्वार येथून प्रारंभ झालेल्या या राष्ट्रव्यापी यात्रेचा समारोप प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने पार पडलेल्या या समारोप सोहळ्यावेळी संगम घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांतून स्वर्गीय अजित पवार यांच्याविषयीचे अपार प्रेम,आदर व सन्मान व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सचिव धनंजय शर्मा, उत्तरप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र सिंग, उत्तरप्रदेशातील भाजपचे प्रमुख नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा >> Ajit Pawar News : 'वच्चा रे वच्चा'म्हणजे काय? अजित पवारांनी दिली होती घोषणा
नीरा आणि कऱ्हा नदीच्या संगमावर अस्थी विसर्जित
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी 28 जानेवारी रोजी बारामती अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. शाश्रू नयनांनी अजित पवारांना गुरुवारी 29 जानेवारी रोजी मुखाग्नी देण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी 30 जानेवारी रोजी सावडण्याचा विधी कार्यक्रम देखील पार पडला होता.सोनगाव येथील कऱ्हा आणि निरा नदीच्या पवित्र संगमावरती पुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते दादांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर
यावेळी शरद पवार सुप्रिया सुळे,एकनाथ खडसे,सदानंद सुळे अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार,आमदार रोहित पवार,अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांसह पवार परिवार आणि बारामतीकर उपस्थित होते.अपघाताच्या घटनेनंतर आता दहाव्याच्या विधी देखील पार पडला आहे. सावडण्याच्या विधी दिवशीच इतर विधी करून घेतल्याची माहिती पवार कुटुंबियांकडून देण्यात आली होती.त्यामुळे इतर विधीत कुटुंबीय वगळता कोणालाही सहभागी होता आले नाही.त्यानंतर आता कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रयागराज मध्येही अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world