जाहिरात

NCP News: आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडणार? 'या' नेत्याच्या संकेतामुळे एकच खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी आमदारांनी आणि माजी आमदारांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाले पाहीजे असं वक्तव्य वेळोवेळी केली आहेत.

NCP News: आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड घडणार? 'या' नेत्याच्या संकेतामुळे एकच खळबळ
अकोला:

एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही बहीण भाऊ एकत्र येण्याची चर्चा काही थांबताना दिसत नाही. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार याची चर्चाही गेल्या काही काळापासून सुरू आहे. दोघांनी ही याला कधी नकार दिला नाही. उलट त्यांची वक्तव्य ही संभ्रम निर्माण करणारीच होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना आजही हे दोघे एकत्र येतील अशी आशा आहे. त्यात आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत राष्ट्रवादीत मोठी घडामोड होवू शकते असे संकेत त्यांनी दिले आहेत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे.'पांडूरंगाची इच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा'. मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे मिटकरींनी सुतोवाच केलं आहे. पांडूरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं मिटकरींनी भाकीत केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी आमदारांनी आणि माजी आमदारांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाले पाहीजे असं वक्तव्य वेळोवेळी केली आहेत. त्यानुसार पडद्यामागे काही हालचाली सुरू असल्याचेही संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांच्या गोटात असलेले एक एक नेते आता त्यांची साथ सोडत अजित पवारांकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे असचं सुरू राहीलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता असल्याने अजित पवारांची बाजू ही उजवी समजली जात आहे.

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची बातमी आधून मधून येत असते. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीही बंद दाराआड झालेल्या आहेत. त्यामुळे हे जरी वेगळे असले तरी आतून एकच आहेत अशी ही चर्चा राजकीय वर्तूळात झालेली आहे. दरम्यान  अकोल्यात येऊन अमोल मिटकरींची पोलखोल करणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना अकोलाकरांची पाहूणचार करण्याची पद्धत आहे. ती अकोल्यात आल्यानंतर लक्ष्मण हाकेची सुद्धा केली जाणार असल्याचं आमदार मिटकरी यावेळी म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com