जाहिरात

'धोकेबाजांचा हिशेब होईल'कडूंच्या बालेकिल्ल्यात राणा कडाडल्या,काय काय बोलून गेल्या?

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील संघर्ष हा टोकाला गेला आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

'धोकेबाजांचा हिशेब होईल'कडूंच्या बालेकिल्ल्यात राणा कडाडल्या,काय काय बोलून गेल्या?
अमरावती:

शुभम बायस्कार 

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंना राणा दाम्पत्याने कारणीभूत ठरवलं. तेव्हापासून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील संघर्ष हा टोकाला गेला आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात बच्चू कडूंचे होमग्राऊंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परतवाड्यात जावून नवनीत राणांनी थेट बच्चू कडूंनाच आव्हान दिलं आहे. यावेळी कडूंवर तोंडसुख घेत धोखेबाजांचा हिशेब करायचाच असा इशारा दिला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीच्या परतवाड्यात भाजपचे नेते आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा  यांच्या उपस्थितीत दहीहंडीचे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान नवनीत राणा यांनी प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टिका केली. सुपारी बाजांनी माझा पराभव करण्याची सुपारी घेतली होती. असे म्हणत नवनीत राणांनी थेट आपला मोर्चा बच्चू कडूंच्या दिशेने वळवला. कडू यांचा उल्लेख त्यांनी तोळी बहाद्दर, ब्लॅकमेलर, सुपारीबाज, ढोंगी, गारुडी असा केला. तर वीस वर्षात अचलपूर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडूंनी तुम्हाला रोजगार दिला काय? असा प्रश्न राणांनी दहीहंडीत सहभागी झालेल्या जनसमुदायाला उपस्थित केला. 

ट्रेंडिंग बातमी - मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?

वीस वर्षात एकही उद्योग अचलपूर मतदारसंघात आला नाही. मंत्री असताना येथील फिनले मिल बंद पडली. ती सुद् त्यांना सुरू करता आली नाही. वीस वर्षात  भ्रष्टाचार करून सुपारी बहाद्दराने फक्त पैसे कमावले. एकाही व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पण स्वतःसाठी सात पिढ्यांच्या रोजगारांची व्यवस्था त्यांनी केली आहे असा आरोप यावेळी केला. त्यामुळे यावेळी सुपारी बहाद्दराला अचलपूर मतदार संघातून आऊट करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 

ट्रेंडिंग बातमी - कानाखाली लगावली, बदला म्हणून 5 अल्पवयीन मुलांनी केलं भयंकर कृत्य, तुम्ही ही थक्क व्हाल

तसे केले तर  सुपारी पण आऊट होईल आणि नाटक सुद्धा बाहेर येईल असा हल्लाबोल त्यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. धोकेबाजांचा हिशेब होईल. त्याला माफी नाहीच अशी आक्रमक भूमिका नवनीत राणा यांनी मांडली.  बच्चू कडूंच्या होम ग्राउंड नवनीत राणा यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची त्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा आहे. लोकसभेला लोकांच्या भविष्यासाठी उभी होती. आता बेईमान लोकांना जागा दाखवण्यासाठी मैदानात असणार असल्याचं त्या म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

बच्चू कडूंवर टीकास्त्र सोडणाऱ्या नवनीत राणांनी मात्र स्वतः खासदार असताना केलेल्या कामांची यादी यावेळी दाखवली. रेल्वे वॅगन कारखाना, मेडिकल कॉलेज, टेक्सटाईल पार्क, शकुंतला रेल्वे प्रकल्प, अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी सुरू असलेले प्रयत्न या महत्वपूर्ण कामांसाठी आपला सातत्याने पाठपुरावा केला.  यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडल्याचा दावा यावेळी नवनीत राणा यांनी केला. मात्र त्यांनी केलेल्या टिकेमुळे अमरावतीचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची दाट शक्यता आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com