जाहिरात

अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा? काय आहे नेमकं सत्य?

Amravati Lok Sabha Election 2024 Result : अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचे एक कथित छायाचित्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अमरावतीमध्ये काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा? काय आहे नेमकं सत्य?
Amravati विजयी मिरवणुकीतील व्हायरल झालेला हाच कथित फोटो (Viral Photo)
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. अत्यंत चुरशीनं झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार नवनीत राणा यांचा 19,731 मतांनी पराभव केला. या निकालानंतर अमरावतीचं राजकारण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस पक्षाकडून शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचे एक कथित छायाचित्र सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या छायाचित्रावरुन आक्रमक झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

बळवंत वानखेडे यांच्या विजयानंतर अमरावतीमध्ये 4 जून रोजी काँग्रेसकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. भाजपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 20 ते 25 अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याच प्रकरणात सात आरोपींना अटक देखील करण्यात आली.

( नक्की वाचा : पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय )

 

हे प्रकरण ताजे असतानाच याच मिरवणुकीच्या दरम्यान राजकमल चौकात काही अज्ञातांनी पाकिस्तानचा झेंडा  फडकविल्याचा कथित फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ( Pakistan flag in Congress victory procession know the truth) झाला आहे. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी याबाबत अमरावती पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हा प्रकार अतिशय गंभीर आहे. जातीय तेढ निर्माण करणार आहे. समाजात दुही पसरविणारा असल्याचे त्यांनी नमूद करत घटनेची चौकशी करावी आणि आरोपीविरुद्ध कठोर कारवाई, अशी मागणी केली आहे.

Latest and Breaking News on NDTV

भाजपच्या शिष्टमंडळानं विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत देशपांडे यांच्या नेतृत्वात अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेतली. दरम्यान प्रशांत देशपांडे यांनी स्पष्ट केले की, शत्रू राष्ट्राचा ध्वज विजयी मिरवणुकीत फडकविणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. या घटनेमागील सत्य समोर यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनीही पोलीस आयुक्तांना निवेदन देत अमरावतीची शांतता भंग करण्याचा हा प्रकार नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)

काँग्रेसनं या विषयावर आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधण्याची मागणी केलीय. या प्रकारावरून 'सत्ताधारी आणि विरोधक' अमरावतीत आमने-सामने आले आहेत. दोघांनीही याविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. तर पोलिसांनी हे छायाचित्र फेक असल्याचा दावा केलाय.  फेक फोटो व्हायरल करणारा तो व्यक्ती नेमका कोण आहे? याचा शोध मात्र अद्यापही लागलेला नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com