लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिरूर लोकसभा मतदार संघाची भाजपची आढावा बैठक नुकतीत पार पडली. या बैठकीतला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या बैठकीत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांवर सडकून टिका केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, तसा निर्णय घ्या अशी मागणीच त्यांनी केली. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवार सत्तेत असतील तर असली सत्ता आम्हाला नको असेही ते थेट पणे बोलले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील भाजप संपलण्याचे काम केले. त्यांनात आता आमच्या बोकांडीवर बसले आहे. याचा प्रचंड त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांना होत आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण ते निधीही देत नाहीत. अजित पवारांमुळेच राहुल कुल मंत्री, पालकमंत्री होवू शकले नाहीत. अनेकांना महामंडळं मिळाली असती, पण त्यालाही अजित पवार आडकाठी करत आहेत ही खदखद सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केली.
ज्यांच्या विरोधात दहा दहा वर्षे संघर्ष केला त्या राष्ट्रवादीला सत्ता आणण्यासाठी आम्ही काम करणार नाही अशीच भूमीका त्यांनी घेतली. राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यासाठी आम्ही काम कराचं का? असा प्रश्नही त्यांनी केला. उद्या येणाऱ्या सत्तेत राष्ट्रवादी येणार असेल तर तसली सत्ता आम्हाला नको असेही ते यावेळी म्हणाले. ही भावना आपली नाही तर पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा आहे की अजित पवार सत्तेत नकोत. पुण्या बरोबरच सोलापूरातही राष्ट्रवादीकडून भाजपला त्रास होत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचेच काम राष्ट्रवादीने आतापर्यंत केले आहे असेही ते म्हणाले. आता त्यांच्यासाठी सत्ता आम्ही आणणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य, आता महायुतीची कोंडी?
सुदर्शन चौधरी यांनी आरोप केलेला हा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय त्यांनी हाच व्हीडिओ त्यांच्या फेसबूकवरी अपलोड केला आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर वरवर जरी महायुतीत सर्व काही ठिक आहे असे दर्शवले जात असले तरी स्थानिक पातळीवर सर्व काही ठिक नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world