जाहिरात

शरद पवारांसारखी माझीही अवस्था झालीय! भावाने प्रतिस्पर्ध्यासोबत हातमिळवणी केल्याने हर्षवर्धन संतापले

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाला बळकटी मिळाल्याचे म्हटले जाते. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शरद पवारांसारखी माझीही अवस्था झालीय! भावाने प्रतिस्पर्ध्यासोबत हातमिळवणी केल्याने हर्षवर्धन संतापले
इंदापूर:

इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी यंदा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे. अपक्ष, काँग्रेस, भाजप असे विविध पक्ष फिरून आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. इंदापूरचे सध्याचे आमदार दत्ता भरणे यांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांना धोबीपछाड देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. मात्र त्यांच्या आव्हानातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बळ मिळालंय. कारण त्यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिस्पर्ध्यासोबत हातमिळवणी केली आहे. 

नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांचे 45 शिलेदार ठरले! पाहा संपूर्ण यादी

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी परिवर्तन महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला. अपक्ष बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांच्यासाठी त्यांनी प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा हर्षवर्धन पाटील यांना धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भावाने प्रतिस्पर्ध्यासोबत हातमिळवणी केल्याने काहीशी हताश प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्वत:ची तुलना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांशी करत म्हटले की, "मागील तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये काही पदाधिकारी मोठे केले, काही कार्यकर्ते मोठे केले. त्यांना मान सन्मान दिला, त्यांना पदे दिली. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली,आपल्यामुळे त्यांना मान मिळाला. ही ठराविक स्वार्थी माणसं आपल्याला सोडून गेली. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांची जी अवस्था झाली होती, तीच अवस्था आज माझी झाली आहे."

( नक्की वाचा : ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्ये )

हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, शरद पवारांनी 50 वर्षांत अनेकांना मोठे केले,वेळ आल्यानंतर ही सगळी माणसं पवार साहेबांना सोडून गेली. पवार साहेब एकटे पडले. तीच परिस्थिती आज तालुक्यात माझी झालेली आहे. पण जरी काही माणसं सोडून गेली असली तरी जनता मात्र माझ्याबरोबर आहे. जनता माझ्यासोबत असेपर्यंत हर्षवर्धन पाटील डगमगणार नाही.

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाला बळकटी मिळाल्याचे म्हटले जाते. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षातील निष्ठावंताना आवडला नाही.  राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातून इच्छुक असणारे जिल्हा बँकेचे आप्पासाहेब जगदाळे आणि सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला आपली ताकद दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रवीण माने हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: