जाहिरात

Sanjay Gaikwad Controversy: संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज

Sanjay Gaikwad Canteen Controversy: संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

Sanjay Gaikwad Controversy: संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज
मुंबई:

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण केल्याने शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना फटकारले. लोकप्रतिनिधी या नात्याने योग्य ती तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा: आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरुन संजय गायकवाडांचा राडा; कँटिन चालकाला बेदम मारहाण )

मारहाण योग्य नाही!

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणावर भाष्य केले. आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासमधील कॅन्टीनचे निकृष्ट जेवण खाल्ल्यामुळे उलटी झाली होती. इतरांना असा त्रास होऊ नये यासाठी आमदार गायकवाड यांनी तात्काळ कॅन्टीनमध्ये धाव घेतली आणि अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली होती.

( नक्की वाचा: वरणासाठी कँटीनच्या मॅनेजरला मारणारे आमदार संजय गायकवाड कोण आहेत? )
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रार करून त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, परंतु मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही." संजय गायकवाड यांना समज दिली असून "असे करणे योग्य नाही, आम्ही याचे समर्थन करत नाही," असे स्पष्टपणे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केली नाराजी

आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करता येवू शकते. भाजीपाला, पदार्थ खराब असणे, दुर्गंधी येणे, या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. तथापि, तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना म्हटले.

संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली, यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलीन होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com