जाहिरात

शिंदेंचा चेहरा पडला अन् फडणवीस-दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, अमित शाहांसोबतचा 'तो' फोटो होतोय व्हायरल

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? उपमुख्यमंत्री किती असणार? मंत्रिमंडळ कसं असेल? शपथविधी कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत.

शिंदेंचा चेहरा पडला अन् फडणवीस-दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, अमित शाहांसोबतचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
नवी दिल्ली:

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस उलटले तरी अद्याप कोण मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. एकनाथ शिंदेंकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार हे निश्चित झालेलं नाही. 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सर्वजणांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असताना एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं आहे. 

शिंदेंच्या आमदाराचा पराभव , आता थेट राजकीय निवृत्तीबाबत विधान, नक्की काय घडलं?

नक्की वाचा - शिंदेंच्या आमदाराचा पराभव , आता थेट राजकीय निवृत्तीबाबत विधान, नक्की काय घडलं?

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? उपमुख्यमंत्री किती असणार? मंत्रिमंडळ कसं असेल? शपथविधी कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय.

बाबा तुमचा खूप अभिमान वाटतो! श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र

नक्की वाचा - बाबा तुमचा खूप अभिमान वाटतो! श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र

मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होतं. अमित शाहांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अजितदादाही खूश असल्याचं दिसून आलं. त्याचवेळी बाजूला असलेल्या एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पडल्याचं दिसत होतं. शिंदेंच्या बॉडी लँग्वेजवरून ते नाराज असल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी येथे आणखी एक बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी जवळपास दीड तास चर्चा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि त्यांनी थेट अमित शाहांची भेट घेतली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com