जाहिरात

बंडखोरी होणार? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांकडे

भैरवनाथ शुगरमुळे पंढरपूर मतदार संघात सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अशातच सावंत यांनी आता थेट विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे.

बंडखोरी होणार? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांकडे
पुणे:

संकेत कुलकर्णी 

काका पुतण्यांचे राजकारण हे महाराष्ट्राला नवीन नाही. या राज्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी काका पुतणे एकत्र तर कधी पुतण्याने बंडखोरी केल्याचे प्रसंग दिसले. अशातच आता राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी विधानसभेसाठी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांचा पुतण्या आपल्या चुलत्यासोबत हरकत घेणार का ? असा प्रश्न पुढे आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचा कारभार पाहतात. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असणाऱ्या मंगळवेढा जवळच्या भैरवनाथ शुगरमुळे पंढरपूर मतदार संघात सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. अशातच सावंत यांनी आता थेट विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. पंढरपूरचे विद्यमान आमदार भाजपचे असल्याने महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळणे अशक्य आहे. अशातच आमदारकीसाठी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला जवळ करायचे मनसुबे अनिल सावंत यांचे दिसत आहेत. अशावेळी  पुतण्या अनिल सावंत यांनी बंडखोरी केल्यास काका आरोग्य मंत्री तानाजी सावंत शिवसेनेकडून पंढरपुरात कुठला निर्णय घेणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार

तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघावर नुकताच दावा केला. यानंतर आता अनिल सावंत हे पंढरपूर मतदार संघावर दावा करत आहेत. मात्र अनिल सावंत यांनी पंढरपुरात दावा करत असताना थेट राष्ट्रवादीशी सलगी करण्याचे धोरण अवलंबले असल्याचे दिसते. त्यामुळे शिवसेनेतील सावंत गट बंडखोरीच्या उंबरठ्यावर दिसत आहे.  

ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत परिचारक गटाच्या काही कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे देखील शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अशातच अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली  असल्याने पंढरपूरचे राजकारण शरद पवारांच्या भोवती विधानसभेपूर्वीच फिरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकाच वेळी तीन तगडे पर्याय शरद पवारांना पंढरपूर विधानसभेसाठी मिळाले आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
"शिंदेजी, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं...", जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शाहांचं मोठं वक्तव्य : सूत्र
बंडखोरी होणार? महायुतीतील मंत्र्याचा पुतण्या आमदारकीसाठी शरद पवारांकडे
vijay wadettiwar on supriya sule Chief minister banner in baramati political news
Next Article
सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार