जाहिरात
This Article is From Apr 08, 2024

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आज संयुक्त पत्रकार परिषद; कोण किती जागा लढवणार?

लोकसभेतील महायुतीचं आव्हान लक्षात घेता शरद पवारांनी अनेक मतदारसंघात राजकीय खेळी करीत सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरेही आपल्या प्रचार सभांमध्ये पक्ष फुटी, गद्दार सरकार, खोके सरकार म्हणत महायुतीविरोधात टीकास्त्र सोडलं.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आज संयुक्त पत्रकार परिषद; कोण किती जागा लढवणार?
मुंबई:

सागर कुलकर्णी 

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.  आज मंगळवारी तिन्ही पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला असून, तिन्ही पक्षाकडून उरलेल्या जागांची घोषणा केली जाणार आहे. 

महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती NDTV मराठीच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे शरद पवार स्वत:  शिवसेनेच्या कार्यालयात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार आहेत.  त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा मान मानला जात आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. 

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट असल्याचं मानलं जात असून महाविकास आघाडीतील सर्वाधिक जागा उद्धव ठाकरे गट लढवणार आहे. अद्याप सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. उद्या गुढीपाडव्याला शिल्लक राहिलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लोकसभेतील महायुतीचं आव्हान लक्षात घेता शरद पवारांनी अनेक मतदारसंघात राजकीय खेळी करीत सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. तर उद्धव ठाकरेही आपल्या प्रचार सभांमध्ये पक्ष फुटी, गद्दार सरकार, खोके सरकार म्हणत महायुतीविरोधात टीकास्त्र सोडलं.

ठाकरे गटाला मिळालेले मतदारसंघ
मावळ 
धाराशिव
परभणी
रत्नागिरी
रायगड
ठाणे
कल्याण
पालघर
नाशिक
शिर्डी
जळगाव
छत्रपती संभाजीनगर
बुलढाणा
हिंगोली
यवतमाळ
हातकणंगले 
सांगली
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई उत्तर
उत्तर पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई)

शरद पवार गटाला कोणते मतदारसंघ?
बारामती
अहमदनगर
माढा
शिरुर
बीड
दिंडोरी
रावेर
सातारा
वर्धा
भिवंडी

काँग्रेसला कोणते मतदारसंघ?
अकोला
लातूर
नांदेड
जालना
धुळे
नंदुरबार
पुणे
सोलापूर
कोल्हापूर
नागपूर
भंडारा-गोंदिया
चंद्रपूर
गडचिरोली
रामटेक
अमरावती
उत्तर मध्य मुंबई 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com