जाहिरात

Arvind Sawant: 'तुम्ही विश्वगुरू तरी एकही देश तुमच्या मागे का नाही?',सावंतांनी लोकसभा हादरवून सोडली

पाकिस्तानला खरा धडा जर कुणी शिकवला असेल तर तो इंदीरा गांधीनी शिकवला होता असं सावंत म्हणाले.

Arvind Sawant: 'तुम्ही विश्वगुरू तरी एकही देश तुमच्या मागे का नाही?',सावंतांनी लोकसभा हादरवून सोडली
नवी दिल्ली:

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी जोरदार भाषण केले. त्यांनी सरकारला धारेवर धरत तुम्ही स्वत:ला विश्वगुरू समजता. पण ऑपरेशन सिंदूर वेळी तुमच्या बाजून एकही देश का उभा राहीला नाही असा खडा सवाल त्यांनी केला. पाकिस्तानच्या बाजून चीन, तुर्की सारखे देश खुले पणाने मदतीला धावले. त्यांना ड्रोन दिले. भारताच्या बाजून एकही देश युद्धात का आला नाही असा सवाल ही त्यांनी लोकसभेत सरकारला केला. यावेळी सावंत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू होते त्यावेळी आपल्या आजू-बाजूचे देश ही आमच्या बरोबर बोलले नाहीत. आमचे पंतप्रधान तर  200 देशात गेले आहेत. ते विश्वगुरू म्हणतात. पण ते नावापुरतेच विश्वगुरू आहेत असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. तुम्ही ऐवढं जग फिरलात पण तुमच्या सोबत एकही देश आला नाही. ते का आले नाहीत याचा विचार करण्याची गरज असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. तुम्ही इस्रायलच्या बाजून गेलात. त्याच वेळी तुम्ही इराणला विरोध केला. जो इराण तुम्हाला आधी तेल देतो मग पैसे द्या असं सांगतो. तो देश ही आता तुमच्यापासून दुर गेला आहे. ही तुमची विदेश निती आहे असा हल्लाबोल करत त्यांनी ऑपरेश सिंदूर वेळी जगातील कुठल्याच देशाची मदत भारताला मिळाली नाही हे अधोरेखीत केले.  
  
ऑपरेशन सिंदूरमध्ये जो काही पराक्रम केला तो आपल्या सैन्याने केला. त्यामुळे आम्ही भारतीय सैन्याला नमन करतो असं ही ते म्हणाले. ऑपरेश सिंदूर झाले. पण ते का झाले हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे ऑपरेशन झाले कारण त्या आधी पहलगामची घटना घडली होती. आपण मंत्री होतो. त्यावेळी काश्मीरला भेट दिली होती. त्यावेळी काश्मीरमध्ये जागोजागी सशस्त्र जवान तैनात होते. पण त्यावेळी एकही जवान पहलगामध्ये नव्हते. असं काय झालं, त्या दिवशी पहलगमध्ये जवान नव्हते. पोलिस नव्हते. असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला. पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणात  पर्यटक आले होते. पण पोलिसांचा तिथे पत्ता नव्हता. तिथे पोलिस राहाणार नाहीत. तिथे जवान तैनात राहाणार नाहीत हे आदेश कुणी दिले? असा प्रश्न उपस्थित करत त्याची चौकशी झाली पाहीजे. या चौकशी पासून खरी सुरूवात झाली पाहीजे असं सावंत यावेळी म्हणाले. आपले जवान नव्हते. पोलिस नव्हते. आपलं इंजिलिजन्स कुठे होतं? असा प्रश्नही त्यांनी केला. पाकिस्तान तिथून किती लांब आहे. जे आतंकवादी तिथे आले होते ते काय नेपाळहून आले होते का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. पुलवामा वेळी काय घडले. त्यावेळचे राज्यपाल सरकारला सतत सांगत होते. पण त्यावेळी लक्ष दिले गेले नाही. राज्यपालांना पंतप्रधानां बरोबर बोलायचं होतं. पण त्यावेळी ते कॉर्बेट पार्कमध्ये बिझी होते. पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले. तो हल्ला करणाऱ्यां पैकी किती जण पकडले गेले असा प्रश्नही सावंत यांनी केला.  

नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

तुम्ही फक्त भावनिक मुद्दी उपस्थित करत आहे. नावही तुम्ही भावनिक दिलं. ऑपरेशन सिंदूर. कुणाचं सिंदूर पुसलं गेलं. ज्यांनी हे सिंदूर पुसलं त्यापैकी किती जण पकडले गेले. आणि तुम्ही ढोल वाजवत आहात. बिहारमध्ये राजकीय भाषण करत आहात. तुम्ही प्रचारासाठी बिहारला गेले पण तुम्हाला पहलगामला जाता आलं नाही. तुम्ही मणिपूरला ही गेला नाहीत. तुम्हाला या गोष्टीची लाज वाटली पाहीजे अशा शब्दात सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तरी ही तुम्ही ढोल वाजवत आहात. आम्ही ही ढोल वाजूवू पण भारतीय सैन्याचा ढोल वाजवू असं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही काय शुरविरता दाखवली. तुम्ही सैन्याला पुर्ण स्वातंत्र्य दिलं. हे खरं पण त्यांचं स्वातंत्र्य तुम्ही का हिरावून घेतलं? कुणाच्या आदेशाने त्याचं फ्रिडम तुम्ही हिरावून घेतलं अशी विचारणा ही त्यांनी केली. पाकिस्तानचे अधिकारी आमच्या समोर याचना करत होते असा तुमचा दावा आहे. जर ते युद्धबंदीची याचना करत होते तर तुम्ही बिनशर्त मागे का हटलात? युद्धबंदी नंतरही जम्मूच्या नागरि वस्तीवर हल्ले कसे होत होते. तिकडे ट्रम रोज पकपक करत होतेय. मी युद्ध थांबवलं. मग सत्य का अशी विचारणाही त्यांनी केली.   

नक्की वाचा - Operation Mahadev: 'ऑपरेशन सिंदूर' वर लोकसभेत चर्चा, त्याच वेळी पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपीचा खात्मा

कारगिलमध्ये ऑपरेशन विजय झालं होतं. पण त्यानंतर ही गलवान, डोकलाम या सारख्या घटना घडल्या होत्या. चीन सीमे रेषेच्या आत  घुसत आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी पाकिस्तानला कुणी मदत केली. चीन -तुर्की त्यांना उघड पणे मदत करत होते. त्यामुळे आपल्याला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. युद्धा वेळी इंटरनॅश्नल फंड पाकिस्तानला कसा मिळाला? त्यावरून जगात आपल्या देशाची काय स्थिती आहे हे जगाला समजसं असं ही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर जगात आपण टीम पाठवल्या. त्यात आपला किती सन्मान झाला. एकत्रीत किती पत्रकार परिषदा झाल्या असा प्रश्न उपस्थित करत हे सर्व  विफल झाल्याचं ते म्हणाले. 

नक्की वाचा - Gaurav gogoi: 'पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले, सरकार हे का सांगत नाही? गौरव गोगोईंचा पलटवार

त्यानंतरही आपले  चीफ डिफेन्स स्टाफ काय म्हणतात. आत्म निर्भर होण्याची गरज आहे. त्यात सर्व काही स्पष्ट होत आहे. म्हणजे आपण परिपूर्ण नाही. ही टीका करण्याची गोष्ट नाही. पण त्यांचे वक्तव्य हे गांभिर्याने घेण्याची गरज आहे. नवाब शरीफ यांना तुम्ही भेटायला गेले होते. ते तुम्ही बिन बुलाये मेहमान होतात. समझोता एक्सप्रेसला बाळासाहेबांनी विरोध केला होता. पाकिस्तान साप आहे असं ते म्हणाले होते. ते पलटून वार करतीत आता नेमकं तसचं झालं आहे असं सावंत म्हणाले. आता तुम्ही  शांती आणि शक्तीची गोष्ट करत आहोता. आधी तुम्ही पीओके ताब्यात घेणार अशा वल्गना करत होता. पीओके घेवूनच राहाणार. हीच ती वेळ होती. का तुम्ही पीओके घेतलं नाही. आता तुम्ही  युद्ध नाही बुद्ध  पाहीजे असं म्हणत आहेत.  ही कधी पासून झालं. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच संधी होती. त्यांना धडा शिकवायला पाहिजे होता. पाकिस्तानला खरा धडा जर कुणी शिकवला असेल तर तो इंदीरा गांधीनी शिकवला होता. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते. तुम्ही  पीओके ताब्यात घेतलं पाहीजे होतं. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं, असं सावंत म्हणाले. घुस के मारेंगे हे कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित आहे का असं सांगत त्यांनी ओसामा बिन लादेनचं उदाहरण दिलं. शिवाय पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणं बंद करा असं ही ते शेवटी म्हणाले.    

Listen to the latest songs, only on JioSaavn.com