जाहिरात

'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?

आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. या पुढचं आंदोलन हे मुंबईत होईल. मुंबईच्या आझाद मैदानात सामुहीक आंदोलन करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

'सरकार कुणाचंही असलं तरी मुंडक्यावर पाय देऊन...' जरांगे पाटील हे काय बोलले?
धाराशिव:

विधानसभा निवडणूक झाली आहे. नवं सरकारही सत्तेवर येईल. महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली आहे. अशा वेळी आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा सरसावले आहेत. आरक्षणाचा लढा थांबणार नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमां बरोबर बोलत होते. आरक्षणासाठी पुढील आंदोलन कसं असेल याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरक्षणासाठीचं आंदोलन थांबणार नाही. या पुढचं आंदोलन हे मुंबईत होईल. मुंबईच्या आझाद मैदानात सामुहीक आंदोलन करण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले. सरकार कुणाचे ही असो मुडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या नव्या सरकारला दिला आहे. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहीजे. त्यासाठी संघर्ष करत राहू. सरकार कोणाचे आहे याची आपल्याला फिक्र नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप

विधानसभा निवडणुकीत आपला फॉर्म्यूला जुळला नाही. तो जुळला असता तर सर्वांचाच सुफडा साफ झाला असता असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडुन आणले आहेत असा दावा त्यांनी केला. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नव्हतो. जर का निवडणुकीच्या मैदानात उतरलो असतो तर सर्वांचा सुफडा नक्कीच साफ झाला असता असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे सोबत असते तर आणखी मोठं बहुमत मिळालं असतं' दानवेंच्या बोलण्याचा अर्थ काय?

दरम्यान आरक्षणाची ही चळवळ थांबणार नाही. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत ही चळवळ सुरू राहील असंही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले यासाठी जरांगे पाटील हे आग्रही आहेत. तर ओबीसी समाजाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला विरोध आहे. अशा वेळी नव्या सरकार समोर मराठा समाजासाठी काय करायचे हा प्रश्न असणार आहे. शिवाय नवे मुख्यमंत्री कोण असणार आहेत यावर ही बरीच गणितं अवलंबून आहेत. अशात आता जरांगे यांनी नवं सरकार सत्तेवर येण्या आधीच आक्रमक भूमीका घेतली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com