आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठ्यांना मदत करणं सरकारने थांबवलं आहे. ही मदत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रोखली असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ही रोखलेली मदत तातडीनं द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जुन्या कुणबी नोंदी सापडूनही अधिकारी आता दखल घेत नाहीत. सरकारने या अधिकाऱ्यांना समज द्यावी असेही ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठ्यांना मदत करणं सरकारने थांबवल आहे. फडणवीसांनी ही मदत रोखली आहे. तातडीनं ही मदत सुरू करावी. अन्याथा राज्यात पुन्हा मोठं आंदोलन उभं करीन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत आहे. त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास राज्यात आणखी मोठं आंदोलन उभं करीन असा इशाराही त्यांनी दिला आहे.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
विधानसभा निवडणुकीसाठी समाजाने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत 500 ते 700 जणांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला आहे. 20 तारखेपर्यंत आपण अर्ज स्विकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. इच्छुक कितीही असले तरी उमेदवारी एकालाच देणार असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याबाबतचा निर्णय ते लवकरच घेणार आहेत. मात्र भाजपचे उमेदवार पाडा हे आवाहन त्यांनी याआधीच केले आहे. आता ते नक्की उमेदवार रिंगणात उतरवणार का? उतरवणार तर कोणाच्या विरोधात उतरवणार याबाबतही सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world