जाहिरात

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा 'तो' राजकीय नेता कोण? जरांगेंनी थेट सांगितलं आता...

या प्रकरणात कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत याची खात्री आहे असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा 'तो' राजकीय नेता कोण? जरांगेंनी थेट सांगितलं आता...
जालना:

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलक असलेल्या मनोज जरांगेंना मारण्याचा कट कुणी रचला होता याची चर्चा सुरू झाली आहे. तो नेता कोण याची ही जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मोठे गौप्यस्फोट केले आहेत. माझ्या विरोधात घातपातचा कट रचला गेला होता असं त्यांनी यावेळी सांगितलं. पण आपण अशा पैदाशीला गिनत नाही अशी थेट भूमीका त्यांनी घेतली आहे.  शिवाय. तू नेता असशील पण तू चुकीच्या ठिकाणी हात टाकला आहेस असा दम ही त्यांनी यावेळी त्या नेत्याला भरला आहे. 

या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे. या कटाचा उलगडा झाल्यानंतर आता समाजाने शांत राहावं असं आवाहन त्यांनी केलं. आता हे कुणी केलं  तो तपासाचा भाग आहे. त्यानुसार  जालन्याचे एसपी स्वत: लक्ष ठेवून आहेत. मात्र आपण उद्या म्हणजेच शुक्रवारी सर्व पुरावे, रेकॉर्डींग तो नेता कोण आहे हे उघड करणार असल्याचं ही स्पष्ट केलं. ज्याने कुणे ही केलं आहे ते पुराव्यासह आपण मांडू असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. 

नक्की वाचा - Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड

या प्रकरणात कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत याची खात्री आहे असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. धमकी देणारा आणि त्यामागचा कोण हे उद्याच्या पत्रकार परिषदेत आपण उघड करणार आहोत. आपल्याल बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आपण बदनाम होत नाही हे पाहिल्यानंतर घातपातावर हे आले आहेत असा आरोपही जरांगे यांनी केला. आमचे या आधीही कार्यकर्ते फोडले. त्यांना विरोधात बोलायला लावले. राजकीय नेत्याने गोळा केलेले हे सगळे जेलमध्ये सडणार असं ही ते म्हणाले. चार पैशांसाठी आयुष्य उद्धवस्त करू नका, माझ्या वाट्याला येवू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

नक्की वाचा - Pune land scam: 1800 कोटींचा घोटाळा एक अन् प्रश्न अनेक ! काय आहेत त्यांची उत्तरं? घोटाळ्याची Insight Story

या प्रकरणी फडणवीसांनी यामध्ये बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे असं ही ते म्हणाले. जीवे मारण्याच्या धमकीनंतर मनोज जरांगे यांनी अशा पद्धतीने आपली भूमीका मांडली आहे. धमकी दिल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र धमकी देणाऱ्या पेक्षा करून घेणारा कोण आहे हे महत्वाचे आहे असं ही ते म्हणाले. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन धमकी देणाऱ्या बाबत खुलासा करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्या ते कोणाचं नाव घेणार, कोणते पुरावे देणार याबाबत उत्सुकता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com