जाहिरात

जानेवारीपासून देशातील सर्वात मोठे आंदोलन उभारणार, जरांगेंची भाजपवर कडवट टीका

जरांगे यांनी म्हटले की जर ते दावा करत असतील की हिंदू संकटात आहेत तर मग मराठ्यांचे काय? मराठ्यांच्या मुलांना होणारा त्रास त्यांना दिसत नाही का ?

जानेवारीपासून देशातील सर्वात मोठे आंदोलन उभारणार, जरांगेंची भाजपवर कडवट टीका
मुंबई:

मराठा आरक्षणासाठी आग्रह धरत आंदोलने करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जानेवारीपासून आपण हे आंदोलन सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. नवे सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण उपोषण करणार असा इशारा जरांगेंनी दिला आहे. हे उपोषण आंदोलन देशातील सर्वात मोठे आंदोलन असेल असेही जरांगे यांनी म्हटले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 28 टक्के हे मराठे असून त्यांच्या पाठबळाशिवाय कोणाचेही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही असे जरांगे यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा :'गद्दारी केली, आता सुट्टी नाही', दिलीप वळसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गरजले!

हिंदू संकटात आहेत असे म्हणणाऱ्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही असा आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांनी पूर्वीच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवरून घूमजाव करत यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या काही उमेदवारांना मराठा समाजाच्या नाराजीचा बराच पटका बसला होता. विधानसभा निवडणुकीतही असा फटका बसणार का याची अनेकांना उत्सुकता आहे.

नक्की वाचा : तुतारी पिपाणी कन्फ्युजनवर उल्हासनगरच्या उमेदवाराची नामी शक्कल

जरांगे पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, यंदाच्या निवडणुकीत मराठे आपली ताकद दाखवतील आणि महायुतीला पराभवाचे तोंड पाहावे लागेल.  जी लोकं हिंदू खतरे में आहेत असे म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे. मतदानाबाबत मराठा समाजाच्या मनात कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले तेच विधानसभेत करायचे आहे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे यांनी म्हटले की, आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानतो, मुसलमानांचा विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो. मराठा समाजाला कोणाला पाडायचे आहे हे नीटपणे माहिती असून त्यांच्या मनात याबाबत कोणताही संभ्रम नाही. जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना मराठा समाज 100 टक्के पाडेल असा विश्नासही जरांगेंनी व्यक्त केला.

हिंदू संकटात आहे मग मराठ्यांचे काय?

जरांगे यांनी म्हटले की जर ते दावा करत असतील की हिंदू संकटात आहेत तर मग मराठ्यांचे काय? मराठ्यांच्या मुलांना होणारा त्रास त्यांना दिसत नाही का ?मराठ्यांच्या कल्याणाची जबाबदारी निश्चित करण्याचेही तुमचेचे काम आहे. जेव्हा आम्ही आरक्षणाची मागणी करतो तेव्हा हिंदूंमधीलच काहीजण त्याला विरोध करतात. मात्र जेव्हा मुसलमानांना लक्ष्य करायचे असते तेव्हा त्यांना मराठ्यांचीच आठवण येते, असे का? असा सवालही जरांगेंनी विचारला आहे.    बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या घोषणांबाबत विचारले असता जरांगे यांनी म्हटले की, हिंदू समाजामध्ये मराठा ही सगळ्यात मोठी जात आहे. आम्ही आमचे मुद्दे आपपासात सोडवू, आम्ही आमची काळजी घेऊ तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com