लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मात्र वेगळी चुल मांडली आहे. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारीही सुरू केली आहे. काही उमेदवारही त्यांनी जाहीर केले आहे. नुकताच त्यांनी मराठावाड्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदार संघांचा आढावा घेतला. आता राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. या सर्व जागा लढण्याच मनसेचा मानस आहे. त्या दृष्टीने राज ठाकरे सध्या चाचपणी करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी भंडारा आणि गोंदीयातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या बरोबर चर्चाही केली. मनसेकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे असं मनसे नेते तेजस मोहतुरे यांनी सांगितले. विदर्भात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या डाटा जमा केला आहे असंही त्यांनी सांगितलं. विदर्भातून सर्व जागा लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. त्यासाठी काही उमेदवार राज या दौऱ्यातच जाहीर करण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?
राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान यवतमाळमधील वणी विधानसभा क्षेत्रात राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या आधी राज ठाकरे यांनी शिवडीतून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामिण मधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विदर्भातूनही राज ठाकरे काही जणांची उमेदवारी जाहीर करू शकतात असे यावेळी तेजस मोहतुरे यांनी सांगितले आहे. विदर्भात मनसेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना आहे. विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. शिवसेना ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटही आपली ताकद आजमावणार आहे. त्यानंतर आता मनसेनेही विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला साथ दिली होती. मात्र विधानसभेसाठी मनसेने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. मनसे महायुतीत जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण मनसे दोनशे पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचे राज यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते महायुतीत जाणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांनी काही उमेदवारही जाहीर केलेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world