जाहिरात

ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार! वेळापत्रक ठरलं; संयुक्त सभा ते वचननामा, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Raj Thackeray And Uddhav Thackeray Rally BMC Election 2026: 5 जानेवारीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. 

ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवणार! वेळापत्रक ठरलं; संयुक्त सभा ते वचननामा, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
मुंबई:

मुंबई महानगरपालिकेसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे. दोन्ही भावांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हे दोन्ही बंधू एकत्र सभा घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून. कोण कोणाविरुद्ध लढणार आहे हे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आता प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील आणि सगळ्या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते सभा गाजवायला सुरूवात करतील. यासोबतच राजकीय पक्ष आपापले जाहीरनामेही प्रसिद्ध करतील. ठाकरे बंधूंनीही यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ते वचननामा याचा संपूर्ण कार्यक्रम तयार झाला आहे. ठाकरे बंधू केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथंही संयुक्त सभा घेणार आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडवून देण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज झाले आहेत. 

नक्की वाचा: BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक: मतदानापूर्वीच महायुतीला झटका, 2 वॉर्डातून उमेदवार बाद!

संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 4 जानेवारीला संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते आपला वचननामा प्रकाशित करणार आहेत. वचननाम्यानंतर ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात उतरतील. त्यांची पहिली संयुक्त जाहीर सभा ही मुंबईत होणार आहे. पाच जानेवारीला ही सभा मुंबईच्या पूर्व उपनगरात होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संबोधित करतील. या सभेद्वारेच ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. 

नक्की वाचा: BMC Election: मुंबईत युती आघाडीची स्थिती काय? 227 पैकी कोण किती जागा लढवणार? वाचा संपूर्ण आकडेवारी

राज आणि उद्धव ठाकरेंच्या 6 संयुक्त सभा होणार

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तीन संयुक्त सभा होणार आहेत. त्यात एक सभा ही पूर्व उपनगरात होणार आहे. तर दुसरी सभा ही पश्चिम उपनगरात होणार आहे. तिसरी सभा ही मुंबई शहरात होईल. या सभेद्वारे  प्रचाराची सांगता होईल असं सांगितलं जात आहे. हा कार्यक्रम निश्चित होण्याआधी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यात प्रचारसभा, वचननामा याबाबत रणनिती ठरल्याचं सांगितलं जात आहे.  

कोण किती जागा लढवणार? 

मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तयार झाली आहे. मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढते आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली आहे. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेना आणि भाजपची युती झालेली नाही. यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढते आहे. याशिवाय मुंबईतील काही भागांत उमेदवारी न मिळाल्याने सगळ्याच पक्षात बंडखोरी झाली आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी बहुरंगी लढती रंगताना पाहायला मिळतील. ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आघाडीबाबत बोलायचे झाल्यास शिवसेना (UBT)- 164 जागा लढणार आहे. मनसे 53 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 11 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना(उबाठा)च्या 113 उमेदवारांची नावे 30 तारखेपर्यंत कळू शकली होती. मनसेच्या सगळ्या म्हणजे 53 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

नक्की वाचा: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com