
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागली आहे. त्यांनी आता निवडणूक प्रचारासाठी नव-कोरं गाणं तयार केलं आहे. हे गाणं सध्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडियवर अपलोड करण्यात आलं आहे. दादाचा वादा असं हे गाणं आहे. तरूण पिढीला ठेका धरायला लावेल असंहे गाणं आहे. निवडणूक प्रचारात हे गाणं केंद्रस्थानी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस एक असताना राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं भलतच प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दादाचा वादा हे गाणं तयार केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या गाण्याच्या माध्यमातून तरूणांना दिलेल्या नोकऱ्या, शेतकऱ्यांना दिलेली मोफत वीज आणि लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत हा दादाचा वादा असल्याचं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे. सांगून आलोया थांबायचं नाय आता,जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर,मागं पुढे आता बघायचं नाय... असं या गाण्यात म्हणत विधानसभा निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
पुढे ही या गाण्यात धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा...जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता... असे बोल या गाण्यात आहेत. गाण्याच्या केंद्रस्थानी हे अजित पवार आहेत. त्यांच्या बरोबरीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहेत. गाण्यात जास्ती जास्त गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या अंगात जोष निर्माण होईल असे हे गाणे बनवण्यात आले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरणार असल्याचे या माध्यमातून अजित पवारांनी दाखवून दिलं आहे.लोकसभेला झालेला पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. हे अपयश विधानसभेला धुवून काढण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. अजित पवारांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संधी असणार आहे. लोकसभेला शरद पवारांनी आपला करिष्मा अजूनही कायम आहे हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे अजित पवारांसमोर स्वत: सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. जे आमदार अजित पवारांबरोबर आले आहेत त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world