विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीती निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीसाठी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई आहे. या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. निधीवाटपावरुन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी अजित पवारांते विश्वासू आमदार अमोल मिटकरींनी भाजपाच्या बड्या नेत्याच्या विरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधान परिषदेचे आमदार असलेले अमोल मिटकरी हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मिटकरी यांनी भाजपा नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला भेट नसल्याची खंत ट्विट करुन व्यक्त केली आहे.
काय केलं ट्विट?
साहेब, राधाकृष्ण विखे पाटील, आपण अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नाबाबत दोन दिवसांपाससुन आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मात्र आपला कॉल लागत नाहीच शिवाय आपले OSDपडवळ,चव्हाण,पवार माने यांचाही प्रतिसाद येत नाही.आमदार म्हणुन खंत व्यक्त करतोय. असं ट्विट मिटकरी यांनी विखे पाटील यांना टॅग करुन केलं आहे.
मिटकरी यांच्या ट्विटमुळे अकोला जिल्ह्यातील प्रश्नावरुन भाजपा आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत.
महाजन-पवार यांच्यात खडाजंगी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गिरीश महाजन आणि अजित पवार या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे. ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. मात्र गिरीश महाजन यांच्या मागणीनंतर पैसे कोठून आणू. आता काय राज्यातील जमिनी विकायच्या का? असा थेट सवाल अजित पवार यांनी विचारला.
यानंतर अजित पवार यांनी सिन्नर तालुक्यात माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात एका स्मारकसाठी कोट्यावधी निधीच्या तरतुदीचा मुद्दा मांडला. मात्र त्यावेळी पैसे नाहीत म्हणून नको तिथ खर्च करायला नको ही तुमची भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला? असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारला.