जाहिरात

Maharashtra Election : पित्याऐवजी पुत्राला संधी, माजी सनदी अधिकाऱ्यांचे स्वप्न भंगले; वादग्रस्त व्यक्तीला तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाने चौथी यादी जाहीर केली. या यादीमध्ये 7 नावांचाच समावेश असला तरी ही यादी चर्चेचा विषय बनली आहे. शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांवरून काही मतदारसंघांमध्ये वाद सुरू असताना ही यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्यामुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Maharashtra Election : पित्याऐवजी पुत्राला संधी, माजी सनदी अधिकाऱ्यांचे स्वप्न भंगले; वादग्रस्त व्यक्तीला तिकीट
मुंबई:

सागर कुलकर्णी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Sharad Pawar) 7 उमेदवारांची नावे जाहीर करणारी यादी प्रसिद्ध केली. ही राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेली चौथी यादी असून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 82 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 99 (Congress) तर शिवसेनेने 84 (Shivsena UBT) उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी उतरवलेल्या काही उमेदवारांवरून वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या चौथ्या यादीमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने घोषित केलेले 7 उमेदवार 

  1. माण-प्रभाकर घारगे 
  2. काटोल-सलील देशमुख
  3. खानापूर-वैभव पाटील
  4. वाई- अरुणादेवी पिसाळ
  5. दौंड-रमेश थोरात
  6. पुसद-शरद मेंद
  7. सिंदखेडा-संदीप बेडसे

पुरंदर विधानसभा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे इच्छुक होते. हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आहे.  माण विधानसभा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख इच्छुक होते. या दोन्ही माजी सनदी अधिकाऱ्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठेंगा दाखवला आहे. माणमधून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश थोरात यांना उमेदवारी दिली आहे. रमेश थोरात हे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात.  महायुतीमध्ये दौंड मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला गेला आहे. विद्यमान आमदार राहुल कुल यांना इथून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या रमेश तुतारी यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ताबडतोब उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

नक्की वाचा :नवाब मलिकांना विरोध करणाऱ्या भाजपाला सना मलिक यांचं उत्तर, अर्ज भरल्यानंतर म्हणाल्या...

सार्वजनिक बांधकाम विभागात खात्याचे अधिकारी असलेले संदीप बेडसे हे नाव बरंच गाजलं होतं. एकेकाळी ते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. मात्र त्यांच्यावर झालेल्या गंभीर स्वरुपाच्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे ते वादात सापडले होते. बेडसे यांनी नोकरीचा तडकाफडकी राजीनामा देत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. या बेडसे यांनाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली.   

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us: