वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव रॅली काढली आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते ओबीसींसाठी मैदानात उतरले आहे. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. शिवाय तसे आरक्षण दिले तरी ते कोर्टात टिकू शकत नाही असा आंबेडकरांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनीआरक्षण बचाव रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली सध्या मराठवाड्यात आहे. त्याच वेळी भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडेही त्या ठिकाणी होत्या. या दोन्ही नेत्यांची भेटही यावेळी झाली. या भेटीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टिका केली आहे. शिवाय त्यांनी या भेटीचा अर्थही लावला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर जोरदार टिका केली आहे. अंधारे यांनी सांगितले आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रमाणिक पणे काम करत आहेत. तर ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सर्वांना दिसत आहे. असे असताना काही काही बोलत असतील, यात्रा काढत असतील तर त्या मागे फडणवीसांचे काय कनेक्शन आहे हे सर्वांनाच माहित आहे अशी टिका अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली आहे. याआधीही भाजपची बी टिम म्हणून प्रकाश आंबेडकरांवर टिका होत होती. आताही अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांकडे बोट करत त्यांच्या बाबतचा संशय वाढवला आहे. त्यात पंकजा मुंडेंची घेतलेली भेट म्हणजे काय? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
प्रकाश आंबेडकर यांची 'आरक्षण बचाव' यात्रा सध्या मराठवाड्यात आहे. आंबेडकर यांची यात्रा लातूरहून बीड जिल्ह्यात दाखल झाली. त्यापूर्वी आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची अचानक भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी अंबाजोगाईमध्ये याबाबत जाहीर वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी भेट घेतली हे खरे आहे. मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो. त्यांनी मला भेटण्या मागचा हेतू काय हे त्याच सांगू शकता असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान 7 ऑगस्टला मंडल दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिलं आहे. त्याला त्यांनी यायचं की नाही हे त्यांनी ठरवावे असेही ते यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world