जाहिरात

Political news: 'कोण एकनाथ खडसे? त्यांना तर...', गिरीश महाजन पुन्हा नाथाभाऊंना भिडले

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकमेकांना पाण्यात पाहातात. कधी काळी दोघे ही एकाच पक्षात होते.

Political news: 'कोण एकनाथ खडसे? त्यांना तर...', गिरीश महाजन पुन्हा नाथाभाऊंना भिडले
जळगाव:

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांमधला संघर्ष थांबता थाबत नसल्याचा दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील हे दोन्ही नेते एकमेकांना घेरण्याची एकही संधी सोडत नाही. मग ते कोणतेही व्यासपीठ असले तरी ते त्याचा वापर एकमेकांवर टीका करण्यासाठी करतात. आता पुन्हा एकदा या दोघांमधील वाद उफाळून आला आहे. यावेळी महाजन यांना खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी कोण एकनाथ खडसे असा प्रतिप्रश्न करत आपण त्यांना जास्त महत्व देत नाही असे दाखवले आहे. त्याला खडसे यांनीही आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. 

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. या दोघांमध्ये विधान परिषदेत वाद झाला होता. तो वाद आता सभागृहाच्या बाहेर ही दिसून येत आहे. खडसे यांच्याबाबत महाजन यांना विचारलं असता कोण एकनाथ खडसे? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी केला. शिवाय खडसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे असं महाजन म्हणाले. विधान परिषदेत खडसेंनी उपस्थित केलेला प्रश्न हा चुकीचा होता. तसे  खडसेंनीच मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी कमजोर झालेली आहे अशा शब्दात महाजन यांनी खडसेंचा समाचार घेतला. 

नक्की वाचा - CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर! घरांची किंमत 25 ते 30 टक्कांनी कमी होणार?

 एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे. ते स्वत: सुसंस्कृत आहेत. शिवाय जगविख्यात ही आहेत. पण मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रात ओळखत नाहीत. स्वाभाविकता त्यांनी हे म्हटले असेल, त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्या वेळेस बोलतात त्यांच्या बोलण्याला फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नसते, असा खोचक टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. त्यामुळे खडसे विरुद्ध महाजन यांच्यातील वाद आणखी टोकाला जाण्याची दाट शक्यत आहे. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'मुळे नव्या निधीला ब्रेक? अजित पवारांच्या विश्वासू मंत्र्याचे सर्वात मोठे विधान

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकमेकांना पाण्यात पाहातात. कधी काळी दोघे ही एकाच पक्षात होते. पण राज्यात भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ खडसे यांना आपल्याला डावलल्याची भावना निर्माण झाली. त्यांनी थेट फडणवीसां बरोबर संघर्ष केला. त्याच काळात गिरीश महाजन हे फडणवीसांचे उजवे हात झाले. जिल्ह्याच्या राजकारणातही गिरीश महाजन यांचे वजन वाढले. पुढे खडसेंन राजीनामाही द्यावा लागला. शेवटी त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची साथ पकडली. मध्यंतरीच्या काळात आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. पण त्यांचा प्रवेश होवू शकला नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com