जाहिरात

Pankaja Munde: 'पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा, तर भाजपचे स्वागत करू' असं कोण म्हणालं?

फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा मुंडे या मंत्री होत्या. शिवाय वजनदार समजलं महिला व बाल विकास खातं त्यांच्याकडे होतं.

Pankaja Munde: 'पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा, तर भाजपचे स्वागत करू' असं कोण म्हणालं?
सोलापूर:

एक वेळी होती की पंकजा मुंडे या राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्वकांक्षा कधी लपवी नाही. आपण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असंही त्या जाहीर पणे बोलल्या होत्या. पण त्यानंतर त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागले. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पक्षाच्या कार्यक्रमापासून त्या दुर सारल्या गेल्या. एक वेळ त्या भाजप सोडणार की काय अशी चर्चाही सुरू झाली. त्यानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. पण तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असा वेळी त्यांना विधान परिषदेवर घेतले गेले. सध्या त्या फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री आहे. अशात आता परत एकदा त्यांच्या नावा पुढे मुख्यमंत्री हा उल्लेख झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. पुरुषांना तोडीस तोड काम त्या करताना दिसत आहे. परंतु आतापर्यंत महाराष्ट्रात महिलेला कधी ही मुख्यमंत्रिपद भूषवता आलं नाही. अनेक महिला या पदासाठी योग्य असतानाही त्यांना ते मिळाले नाही. पंकजा मुंडे या मुख्यमंत्रिपदाचा आक्रमक चेहरा आहेत, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलं आहे.  भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केलं तर आम्ही महिला म्हणून भाजपचे स्वागत करू असं ही देसाई यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तूळात मात्र नवी चर्चा सुरू झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'जिन्नांनाही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषणं...'; उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन थेट सवाल

फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पंकजा मुंडे या मंत्री होत्या. शिवाय वजनदार समजलं महिला व बाल विकास खातं त्यांच्याकडे होतं. त्याच वेळी मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पंकजा मुंडेकडे पाहीलं जात होतं. त्यांचे समर्थक जाहीर पणे त्यांना मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत होते. शिवाय ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जात होते. त्यामुळे फडणवीस यांच्या समोर पक्षांतर्गत आव्हान उभं राहीलं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या घटनाक्रम पाहाता पंकजा मुंडे या काही काळ विजनवासात होत्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यात आता पुन्हा देसाई यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Video : 'मराठीत उद्घोषणा का नाही?' देसाई बाईंनी भररस्त्यात वाहतूक पोलिसाला झापलं!

दरम्यान राज्यात पुरुष अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब दुर्दैवी आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या  धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शना झाल्या नंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळात पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचारच्या घटना वाढल्या आहेत. या संदर्भात देसाई यांना विचारले असता त्यांनी पुरूष हक्क आयोगची मागणी केली आहे. शिवाय पंकजा मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली आहे.