जाहिरात

Operation Sindoor: पाकिस्तानवर हल्ला, राहुल गांधींची एका वाक्यातली पहिली प्रतिक्रीया काय?

पाकिस्तान झोपेत असताना भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानची झोप उडवली आहे.

Operation Sindoor: पाकिस्तानवर हल्ला, राहुल गांधींची एका वाक्यातली पहिली प्रतिक्रीया काय?
नवी दिल्ली:

भारताने पाकिस्तानवर जोरदार एअर स्ट्राईक केला. जवळपास 9 दहशतवाद्यांचे अड्डे या स्ट्राईकमध्ये उद्धवस्त केले. पाकिस्तानची झोप या हल्ल्याने उडाली. पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. या कारवाईचे काँग्रेसने समर्थन केले आहे. शिवाय सैन्याच्या शौर्याला सलाम ही केला आहे. पाकिस्तानला त्यांच्याच शब्दात ठोस प्रत्युत्तर दिले आहे असं ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले. काँग्रेस नेहमीच सैन्य आणि सरकार बरोबर राहीलं आहे. पहिल्या दिवसापासून आपला सैन्य आणि सरकारला पाठिंबा दर्शवला होता असं ही यावेळी खरगे म्हणाले. या कारवाईनंतर काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर खरगे बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

    यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही आपली प्रतिक्रीया दिली आहे. आधी पक्षाचे अध्यक्ष खरगे यांनी या कारवाईच समर्थन करत, सैन्याला सलाम केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रीया दिली आहे. भारतीय सैन्याला आपला संपूर्ण पाठिंबा आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. शिवाय सरकारने सर्वपक्षिय बैठक बोलावली आहे. त्याला काँग्रेस हजेरी लावणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितले.    

    ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर

    त्या आधी खरगे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतूक केले. या कारवाईतून भारताने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले आहे, असे खरगे म्हणाले. पाक व्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. त्या विरोधात भारत नेहमीच उभा ठाकला आहे. दहशतवादा विरोधात भारताचे धोरण राहीले आहे. राष्ट्र हीत हे पहिले पाहिले जाते. देशाचा इतिहास ही तेच सांगत आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी नेहमीच सरकार आणि सैन्या बरोबर राहीला असल्याचं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सत्ताधारी आणि विरोधकांत या मुद्द्यावर कुठलेही मतभेद नाहीत असं ही त्यांनी सांगितलं. 

    ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

    पाकिस्तान झोपेत असताना भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानची झोप उडवली आहे. पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला करण्याता आला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला हे प्रत्युत्तर होतं. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरून गेला आहे. यानंतर  भारताच्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. त्यात जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते.
     

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com