जाहिरात

विधानसभेला भाजपसाठी संघाचा प्लॅन काय? 'या' 6 गोष्टींवर लक्ष द्या नाही तर...

विधानसभा निवडणुकी आधी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. संघाने निवडणुकी आधी भाजप नेते आणि मुख्य पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

विधानसभेला भाजपसाठी संघाचा प्लॅन काय? 'या' 6 गोष्टींवर लक्ष द्या नाही तर...
नागपूर:

संघ आणि भाजप यांच्यात गुरूवारी नागपुरच्या रेशिमबाग येथे समन्वय बैठक झाली. या बैठकी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. शिवाय रणनितीवरही चर्चा झाली. यात निवडणुकीत कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहीजे याच्या सुचना संघाने भाजप नेत्यांना केल्या आहेत. या सहा सुचना असून त्याचे काटेकोर पालन केले जावे असे ही संघाने सांगितले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे  मूळ मुद्दे आणि मूळ कार्यकर्त्यां पासून दूर जाऊ नका अशी समज दिल्याचेही समजत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसला. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला चारीमुंड्या चित केले. भाजपचे केवल आठ खासदार निवडून आले. भाजपला मिळालेल्या या दणक्यानंतर विधानसभा निवडणुकी आधी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला आहे. संघाने निवडणुकी आधी पक्षातील नेते आणि मुख्य पदाधिकाऱ्यांना  महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. गुरुवारी नागपुरच्या रेशिमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृति परिसरात विधानसभा मतदार संघ निहाय भाजपच्या महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या.  संघाचे सह कार्यवाह अतुल लिमये हे या बैठकीला उपस्थित होते. त्यात सहा मुख्य बिंदूंवर जोर दिला गेला आहे.

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले

त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जातीय आणि सामाजिक समीकरणे जुळविताना हिंदुत्व विसरू नका असे संघाने ठणकावून सांगितले आहे. तिकीट देताना मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको ही दुसरी सुचना केली आहे. भाजपचे मूळ मुद्दे ध्यानात असू द्या आणि मूळ समर्थक मतदार यांना देखील दूर करू नका. विरोधक खोट्या narrative द्वारे संभ्रम निर्माण करत असतील तर पुराव्यांसह ठोस उत्तर द्या. पक्षाची शक्ती आणि अनुकूलता असलेल्या मतदार संघात मतांची टक्केवारी 60 पर्यंत नेण्यात यावी. मायक्रो प्लानिंग अर्थात सूक्ष्म नियोजन करण्यावर भर देऊन सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांना देखील नेत्यांनी लक्ष देऊन त्यांना उत्साहाने कामाला लावावे. अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस

मूळ मुद्दे आणि मूळ कार्यकर्त्यां पासून दूर जाऊ नका, या शब्दात संघाने भाजपला समज ही दिल्याचे समजत आहे. यानंतर आता विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी भाजपचे मूळ कार्यकर्ते आता राहिले कुठे असा सवाल केला आहे. भाजप ने दुसऱ्या पक्षांना फोडले आहे. त्यांचे कार्यकर्ते पक्षात आणून त्यांना चांगली मेजवानी दिली आहे. त्यामुळे, भाजपचे मूळ कार्यकर्ते निराश झाले आहेत. अशी टीका देशमुख यांनी  केली आहे.

Previous Article
'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?
विधानसभेला भाजपसाठी संघाचा प्लॅन काय? 'या' 6 गोष्टींवर लक्ष द्या नाही तर...
jammu and kashmir assembly election 2024 voting for 24 seats in phase 1
Next Article
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय