जाहिरात

Sangli News : 'धर्मांतरणासाठी येणाऱ्यांचा सैराट करा', 11 लाख मिळवा, भाजपा आमदाराचे आवाहन

धर्मांतर करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा, त्यांना सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

Sangli News : 'धर्मांतरणासाठी येणाऱ्यांचा सैराट करा', 11 लाख मिळवा, भाजपा आमदाराचे आवाहन
Sangli News : भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांनी मोठा इशारा दिला आहे.
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

धर्मांतर करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा, ठोकणाऱ्यांना बैलगाडी शर्यतीप्रमाणे दोन लाख, तीन लाख, पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले पडाळकर?

धर्मवीर संभाजी महाराजांनी माझा जीव गेला तरी धर्म बदलणार नाही असे औरंग्याला सांगितले. हाल हाल होऊन मेले तरी तरी धर्म बदलला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांची विचारांची कन्या ऋतुजा आहे, असं पडाळकर यांनी यावेळी सांगितलं.

लव्ह जिहाद करणारे हिरवे साप आहेत. तसे ख्रिश्चन धर्मांतरण करणारे अजगर आहेत. या अजगरांवर जेसीबी फिरवण्याचे काम केले पाहिजे. धर्मांतरण करणाऱ्यांच्या औलादीच्या कानावर माझा आवाज जात असेल तर त्यांनी ऐकावे..... राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, हिंदू धर्म टिकला पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा,पोलीसांचे मी बघून घेईन, असा इशारा पडाळकर यांनी दिला. 

महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी उद्याच्या उद्या सांगली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळाची यादी जाहीर कराव. तिसरया दिवशी ते प्रार्थनास्थळ उध्वस्त करावे. तसे झाले तर याच चौकात 10 हजार नागरीकांच्या उपस्थित सत्कार करु. अन्यथा तुमची गाठ हिंदू समाजाशी आहे. हिंदूंनीच फक्त कायदा पाळायचा का? सरकारी नोकरी हिंदू धर्मानुसार आरक्षण घेऊन झाली असेल आणि त्यानंतर धार्मिक पूजा वेगळी असेल तर त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी पडाळकर यांनी दिली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com