जाहिरात

महायुतीत जागा वाटपावरून फाटणार? दादा-साहेब एकत्र येणार? 'त्या' वक्तव्याने खळबळ

नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा ही झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपली तयारी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराने एक वक्तव्य केल्याने मात्र खळबळ उडाली आहे.

महायुतीत जागा वाटपावरून फाटणार? दादा-साहेब एकत्र येणार? 'त्या' वक्तव्याने खळबळ
पुणे:

विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महायुतीने आपण एकत्रीत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रीत लढणार आहेत. शिवाय लवकरच जागा वाटपाची चर्चाही होणार आहे. नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा ही झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपली तयारी सुरू केली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराने एक वक्तव्य केल्याने मात्र खळबळ उडाली आहे. राजकारणात काही होवू शकतं असं सांगत पुढे काय होईल त्याचे संकेत देवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार गटाचे आमदार अतुल बनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर बेनके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार याची चर्चा सुरू झाली. शिवाय ज्यांनी लोकसभेला आम्हाला मदत केली, ते सर्व आमचे आहेत असे वक्तव्य करून पवारांनी गुगली टाकली. मात्र त्याही पुढे जात अतुल बेनके यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही घड्याळ चिन्हावर लढणार की तूतारी चिन्हावर लढणार असा प्रश्न बेनके यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 

ट्रेंडिंग बातमी - दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?

पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत काहीही होवू शकतं.महायुती म्हणून आम्ही एकत्र लढण्याचे ठरवले आहे. पण त्यातही जागावाटपा वरून महायुतीत खडा पडू शकतो. ऐवढेच काय तर शरद पवार साहेब आणि अजित दादा हेही एकत्र येवून निवडणूक लढवू शकतात. असे वक्तव्य करून एक च खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान शरद पवारां बरोबर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार

दरम्यान शरद पवारांची भेट घेतल्याचे बनके यांनी सांगितले. कौटूंबिक संबध असल्याने ही भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा नव्हती असेही ते म्हणाले. पक्षात फुट पडल्यानंतर मतदार संघाच्या विकासासाठी अजित पवारांना साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुढे काय होईल हे सांगता येत नाही असेही ते म्हणाले. खासदार अमोल कोल्हे हे आपले मित्र आहेत, या पुढेही ते मित्र राहतील. हे सांगत असताना लोकसभेला आपण अढळराव पाटलांचे काम केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com