
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना आपल्या गोटात घेण्याचे अनेक प्रसंग समोर आले. एकनाथ शिंदे गटाने ही काही जण आपल्या गळाला लागतात का? याचा प्रयत्न केला होता, अशा बातम्या ही आल्या. ठाकरे गटाच्या खासदारांना तर ताकीद देण्यात आली होती. उदय सामंत यांनी तर अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. शिवाय ठाकरे गटात फक्त पिता पुत्र राहतील असं ही वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे गट सतर्क झाला होता. आता भाजपनेही ठाकरे गटाचे कुणी गळाला लागतय का? याचीच जणू चाचपणी सुरू केली आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निमित्त होतं पुण्याच्या खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 36 दुष्काळग्रस्त गावांतील पाणीटंचाईचा. उत्तर पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे. खेडचे आमदार हे बाबाजी काळे आहेत. ते शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आले आहेत. त्यांच्या मतदार संघातही पाण्याचा प्रश्न मोठा आहे. या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे हे या भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका जाहीर कार्यक्रमात गोरे आणि आमदार काळे हे एकाच मंचावर आले होते. त्यावेळी गोरे यांनी थेट काळे यांना भाजपमध्ये येण्याचीच ऑफर दिली.
यावेळी बोलताना गोरे म्हणाले की लोक बाबळीच्या झाडाखाली सावलीसाठी कधीच उभे राहात नाहीत. तर सावलीसाठी ते आंब्याच्या झाडाखाली येतात. त्यामुळे बाबळी खाली किती काळ उभे राहाणार. आब्याच्या झाडाखाली सावली ही मिळते आणि आंबे ही मिळतात असं सुचक वक्तव्य ही गोरे यांनी केली. शिवाय आता तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या असं सांगितलं. शिवाय कसं केलं तर तुमचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असं आमिष ही त्यांनी यावेळी दाखवलं. गोरे यांनी एक प्रकारे ठाकरेंच्या आमदाराला खुली ऑफरच दिली.
उत्तर पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न मोठा आहे. गोरे यांनी 36 गावांतील ग्रामस्थांना जनतेच्या पाणीप्रश्नासाठी शासनदरबारी वकील म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यांनी या दौऱ्या वेळी ठाकरेंच्या आमदाराला चुचकारले आहे. शिवाय खुली ऑफरही दिली आहे. त्यामुळे आमदार काळे यांच्या मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्यावेळी गोरे यांनी ही ऑफर दिली त्याच वेळी काळे हे स्टेजवर होते. त्यांना गोरे यांची ही ऑफर ऐकून हसू आवरले नाही. त्यांनी त्याच वेळी गोरे यांना हात जोडले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world