छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गातील राजकोटवर कोसळला. त्यानंतर त्याच्या तिव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली. पण शिवप्रेंमींचा राग काही कमी झाला नाही. महाविकास आघाडीने तर जोडे मारो आंदोलन करत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. जोरदार हवेमुळे पुतळा कोसळल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर तर एकच हंगामा झाला. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुतळ्या बाबत मोठं विधान केलं आहे. हा पुतळा का पडला? याचे कारण त्यांनी सांगितले आहे. शिवाय याबाबतचा आपला अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकोटवर असलेला छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा कोसळला. हा पुतळा जर स्टेनलेस स्टिलचा बनवला असता तर तो कोसळला नसता असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. समुद्र किनाऱ्याच्या तिन किलोमिटर अंतरात असलेली बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला जावा असा आपला नेहमीच आग्रह असतो असे गडकरी यावेळी म्हणाले. हे बांधकाम सुरक्षित समजले जाते. शिवाय गंज लागण्याची भितीही नसते. जर मालवण इथं उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टिलचा असता तर तो कोसळला नसता असे गडकरींनी स्पष्ट केले. मुंबईत ज्या वेळी 55 उड्डाणपूल बांधले त्यावेळचा अनुभवही गडकरींनी सांगितला. त्यामुळे समुद्रकिनारी किंवा त्याच्या आजूबाजूला कोणतेही बांधकाम असेल ते स्टेनलेस स्टिलचे असावे असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?
नितीन गडकरींनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गडकरी हे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. ते प्रत्येक काम बारकाईने करत असतात. त्या कामात ते स्वत:ला गुंतवून घेत असतात. त्यांनी आता पुतळ्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्या आधी त्यांनी तज्ज्ञांबरोबर चर्चा केली असेल. त्यानंतरच ते वक्तव्य केलं असेल असे शरद पवार यावेळी म्हणाले. शिवाय पुतळा कोसळला त्याला सरकार जबाबदार असल्याचे पुन्हा पवार म्हणाले. ज्या व्यक्तीला हे काम दिलं होतं त्याचा अनुभवही तेवढा मोठा नव्हता. शिवाय महाराजांचे अनेक पुतळे उभारले गेले आहे. त्या पुतळ्यांना काही झाले नाही असेही ते म्हणाले. मात्र राजकोटवरील पुतळा कोसळला असं त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने सरकार विरोधात रान उठवले. जोडे मारो आंदोलन छेडले. त्यात मोठ्या प्रमाणात गर्दीही जमवली होती. त्यामुळे सरकारवरही दबाव वाढला होता. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माफी मागावी लागली होती. पण चुकीला माफी नाही असे सांगत मविआने अजून आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणी कोल्हापूरमधून एकाला अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world