जाहिरात

कॅमेऱ्या समोर कपडे बदलावे लागले, लेस्बियन म्हणून हिणवले, मासिक पाळीत तर...बालगृहात काय काय घडले?

रेश्मा चिमंद्रे या जिल्हा महिला, बाल अधिकारी आहेत. यांच्याकडेच विभागीय उपायुक्तांचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यांना सगळ्या गोष्टी अवगत असताना त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला.

कॅमेऱ्या समोर कपडे बदलावे लागले, लेस्बियन म्हणून हिणवले, मासिक पाळीत तर...बालगृहात काय काय घडले?
मुंबई:

छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहातून काही अल्पवयीन मुली पळाल्या होत्या. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. त्यामुली का पळाल्या यामागचे धक्कादायक वास्तव ही समोर आले आहे. याबाबतचा सर्वांनाच हादरवून लावणारा खुलासा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला आहे. त्या सुधार गृहात त्या अल्पवयीन मुलींबरोबर काय काय होत होतं याचा पाढाच त्यांनी वाचला आहे. त्यांनी जे काही सांगितलं आहे त्यावरून त्या लहान मुलींना किती छळाला सामोर जावं लागलं असेल याचा अंदाज आल्या शिवाय राहात नाही. 
  
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar News) विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यावेळी या मुलींचा छळ झाल्याचे समोर आले होते. याबाबतचं वास्तव आता चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत कथन केलं. 30 जूनला 9 मुली पळाल्या होत्या. त्या शिवाय 4 मुली आणखी पळाल्या होत्या याबाबतची आपल्याकडे माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र त्या मुलींबाबत पोलीस स्टेशनला काहीही कळवले नव्हते असं ही त्यांनी यावेळी सभागृहाला सांगितलं. मात्र या मुली का पळाल्या याबाबतची धक्कादायक माहिती वाघ यांनी सभागृहाला दिल्यानंतर सर्वच जण हादरून गेले.  

नक्की वाचा - NDTV मराठीचा इम्पॅक्ट! छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

सुधारगृहात मुली एकमेकींच्या जवळ आल्या तर त्यांनी समलिंगी किंवा लेस्बियन म्हणून हिणवण्यात येत होते. काही मुली या पोक्सो केसमधील होत्या. त्यांनी थेट वेश्या म्हणून सांगण्यात येक होते. मुलींच्या झोपण्याच्या रुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली. ऐवढचं नाही तर कहर म्हणजे मुलींना कॅमेरासमोर कपडे बदलावे लागत होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या वेळी मुलींना  मासिक पाळी येत होती त्यावेळी त्यांना सॅनेटरी पॅड दिले जात होते. पण दुसरा पॅड हवा असल्यास पहिला दाखवल्या शिवाय दुसरा दिला जात नव्हता अशी माहिती ही त्यांनी सभागृहाला दिला. अशा प्रकार या मुलींचा छळ इथं सुरू होता. 

नक्की वाचा- Beed News: मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं; नातेवाईकही हादरले

या बालगृहात केवळ रक्ताचं नात असलेल्या लोकांनाच भेटण्याची परवानगी होती. पण तसं इथं होत नव्हतं. ज्यांचं रक्ताचं नात नाही अशी व्यक्ती ही या ठिकाणी येत होता. शेख नावाच व्यक्ती त्या पैकीच एक असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीवर त्याने आणि त्याच्या बापाने अत्याचार केलेत. त्याला बालगृहात मुलीला भेटण्याची परवानगी कशी दिली? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदू धर्मियांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. असा धक्कादायक आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. 

नक्की वाचा -  Shinde Sena MLA Violence : आमदार निवासातील निकृष्ट जेवणावरुन संजय गायकवाडांचा राडा; कँटिन चालकाला बेदम मारहाण)

रेश्मा चिमंद्रे या जिल्हा महिला, बाल अधिकारी आहेत. यांच्याकडेच विभागीय उपायुक्तांचा अतिरिक्त चार्ज आहे. त्यांना सगळ्या गोष्टी अवगत असताना त्यांनी या मुलींचा छळ होऊ दिला. त्यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल झाला पाहीजे अशी मागणी ही वाघ यांनी या निमित्ताने केली.  सिस्टर अलका अधीक्षिका ज्यांनी या मुलींना छळले त्यांच्यावरही कारवाई होणार का ? गुन्हा दाखल होणार का,मान्यता रद्द होणार का ? असे एकामागून एक प्रश्न चित्रा वाघ यांनी आपल्या सरकारला केले आहेत. 

नक्की वाचा - Atal Setu: 'जेवायला घरी येतो,' आईला फोनवर सांगितलं आणि पुलावर गेला! मुंबईतला डॉक्टर अद्यापही बेपत्ता

यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "ज्या काही अनियमितता बाहेर आल्या आहेत त्या भयानक आहेत. जिल्हा बालविकास अधिकारी तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 80 मुलींची चर्चा केली, आधी त्या बोलत नव्हत्या. मात्र आता त्या त्यांच्यासोबत काय घडलं हे सांगत आहेत. अनेक गंभीर गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत. बालगृह  अधीक्षक आणि सगळ्यांवर पोलिसात  गुन्हा दाखल केला आहे. संस्थेची मान्यता पूर्ण रद्द करण्यात आली आहे. 3 वरिष्ठ  महिला पोलीस निरीक्षक याबाबत चौकशी करत आहेत. उद्या  याबाबत अहवाल देणार  आहेत. जे कुणी दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल. हायकोर्ट सुद्धा लक्ष ठेवून आहे,  त्यांनी सुमोटो दाखल करून घेतला आहे." असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com