जाहिरात

पुतळा कोसळला प्रकरणी राज्य सरकारचे मोठे पाऊल, वर्षा निवासस्थानी काय घडलं?

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडवर आले आहे.

पुतळा कोसळला प्रकरणी राज्य सरकारचे मोठे पाऊल, वर्षा निवासस्थानी काय घडलं?
मुंबई:

मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पार्श्वभूमिवर एक तातडीची बैठक आयोजित केली होती. याबैठकीत त्यांनी पुतळा कसा कोसळला याची कारणे शोधण्यासाठी आणि  या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसेसाठी एका तांत्रिक संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली आहे. अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असेल. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने, देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.      

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते. 

ट्रेंडिंग बातमी - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, ठोंबरे हॉस्पिटलमध्ये दाखल

छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या कामाला गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहे. शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर मोठा राग आहे. हे पाहाता राज्य सरकारने तातडीची पावले उचलली आहेत.  

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

दरम्यान झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नव्याने उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com