जाहिरात
This Article is From Mar 21, 2024

'आम्ही 2 रुपये देखील खर्च करु शकत नाही', राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप

सोनिया गांधी ने कहा, "आज हम जिस परेशानी का सामना कर रहे हैं वो काफी गंभीर है. इसकी वजह से केवल इंडियन नेशनल कांग्रेस पर ही असर नहीं हो रहा है बल्कि मूलरूप से लोकतंत्र पर भी इसका प्रभाव पड़ रहा है".

'आम्ही 2 रुपये देखील खर्च करु शकत नाही', राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप
राहुल गांधी ने कहा, "हम कोई एक्शन नहीं ले पा रहे हैं और ये हमला लोकतंत्र पर किया जा रहा है".
नवी दिल्ली:

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) तारखांची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच काँग्रेसनं केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस पक्षाची खाती सध्या गोठवण्यात आली आहेत. त्या विषयावर बोलताना या सर्वांनी केंद्र सरकारवर आरोप केले.

राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं की, 'आम्ही 20 टक्के नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो. पण, आमच्या नेत्यांसाठी 2 रुपयांचं रेल्वे तिकीट खरेदी करु शकत नाही. निवडणूक आयोगानं याबाबत काहीही म्हंटलेलं नाही. काँग्रेसची गळचेपी करण्यासाठी हे सर्व प्रकार सुरु आहेत.'

इन्कम टॅक्स विभागानं  2018-19 या आर्थिक वर्षातील थकबाकी आणि दंडच्या स्वरुपात काँग्रेस पक्षाला 210 कोटींचा दंड आकारला आहे.  त्यासाठी काँग्रेसच्या बँक खात्यातील 115 कोटी रुपये गोठवण्यात आली आहेत. या विषयावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसमधील तीन वरीष्ठ नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

'ही फक्त काँग्रेसची नाही तर लोकशाहीची गळचेपी आहे. आम्ही कोणतंही काम करु शकत नाही. हा लोकशाहीवर हल्ला आहे. आम्हाला जाहिरातींसाठी स्लॉट मिळत नाहीय. आमची खाती गोठवण्यात आली आहेत. कोर्ट किंवा कुणीही यावर बोलत नाही,' असा आरोप राहुल यांनी केला. 

सोनिया गांधी यांनीही यावेळी सरकारवर टीका केली. 'आम्ही सध्या अत्यंत गंभीर अडचणींचा सामना करत आहोत. याचा परिणाम फक्त इंडियन नॅशनल काँग्रेसवर नाही तर लोकशाहीवरही पडू शकतो. काँग्रेसला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. लोकांनी गोळा केलेली खाती गोठवण्यात आली आहेत,' असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com