जाहिरात

strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार

परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत.

strike News: वाहतूकदार संघटनांचा संप सुरूच, सरकार चर्चेसाठी तयार
मुंबई:

वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे शासकीय व वाहतूकदार प्रतिनिधी यांच्या समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देणार आहे. यासाठी उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, पोलीस अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे, सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, परिवहन सहआयुक्त रवी गायकवाड, पोलीस अधीक्षक (महामार्ग) सुनिल भारद्वाज उपस्थित होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परिवहन मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी गठित समितीवर ट्रक, टँकर व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी देखील घेण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे. व्यापार वाढल्याने विकासास चालना मिळते. वाहतूकदारांचा विकासात महत्त्वाचा सहभाग असून त्यांच्या व्यवसायास संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खासगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, माल ट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल, असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?

परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मुंबई शहरात खासगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेससाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगरविकास, गृह व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. ई- चलानबाबत तक्रारीची दखल घेऊन यावेळी गृह विभागास सूचना दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंगब बातमी - Ghanshyam Darode: बर्थ डेला श्रद्धांजलीचे बोर्ड, ‘छोटा पुढारी' भडकला, थेट टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी

अपर मुख्य सचिव चहल व परिवहन आयुक्त  भीमनवार यांनी यावेळी माहिती सादर केली.वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बैठकीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर, स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ट्रक लोरी ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र हेवी वेहिकल इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, वाहतूकदार बचाव कृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com