विधानसभा निवडणुकीत मनसेनंतर वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वंचितने जातीय समिकरण साधत सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे रावेर विधानसभा मतदार संघातून पक्षाने शमिभा पाटील या तृतीयपंथी यांना उमेदवारी देत सर्वांनाच चकीत केलं आहे. त्याच बरोबर सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना संधी दिल्याचे पहिल्या यादीतून दिसत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात यादीत मराठा, बौद्ध, मुस्लीम, ओबीसी, भटक्या जमातीच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय रावेर विधानसभा मतदार संघातून शमिभा पाटील या तृतीयपंथीला उमेदवारी देत मैदानात उतरवलं आहे. एकीकडे मतदार संघाचे वाटप राजकीय पक्षांमध्ये सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी आपली पहिली यादी जाहीर ही करून टाकली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठीही बराच वेळ मिळणार आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates for the Maharashtra Assembly elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2024
We are also pleased to announce the candidates from our alliance partners — Bharat Adivasi Party (BAP) and Gondwana Gantantra Party (GGP).
• Anil Jadhav… pic.twitter.com/BSli5FVDrq
जे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यात सिंदखेडराजा मतदार संघातून सविता मुंढे, वाशिम मेघा डोंगरे, धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून त्यांनी विनय भांगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोकोली मतदार संघातून डॉ.अविनाश नन्हे यांना मैदानात उतरवले आहे.
नादेड दक्षिण मतदार संघातून फारूक अहमद, लोहा शिवा नरागंळे, औरंगाबाद पूर्व विकास दांडगे, शेवगाव किसन चव्हाण, खानापूर संग्राम माने यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने अजूनही तिसऱ्या आघाडीत जायचे की नाही हे ठरवले नाही. त्याची चर्चा सुरू असतानाच वंचितने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे वंचित स्वबळावर निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world