जाहिरात

मालवण मतदारसंघात वैभव नाईक हॅटट्रिक करणार की राणे पुन्हा गड काबीज करणार?

यावेळची मालवणची लढत सुरशीची होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघातून नारायण राणे यांना आघाडी मिळाली होती. ही वैभव नाईक यांच्यासाठी चिंतेची बाब समजली जाते.

मालवण मतदारसंघात वैभव नाईक हॅटट्रिक करणार की राणे पुन्हा गड काबीज करणार?
सिंधुदुर्ग:

कोकणातील हॉट सीटम्हणून ज्या मतदार संघाकडे पाहीले जाते तो म्हणजे कुडाळ मालवण मतदार संघ. या मतदार संघातून नारायण राणे हे 1990 पासून 2014 पर्यंत सतत निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव करत राणेंच्या वर्चस्वाला जबर धक्का दिला होता. त्यानंतर नाईक यांनी सलग दोन वेळा या मतदार संघातून विजय मिळवला आहे. आता हॅटट्रीक करण्याच्या तयारीत ते आहेत. मात्र यावेळी त्यांच्या समोर पुन्हा एकदा राणे कुटुंबातील सदस्यच असेल अशी चर्चा आहे. त्यामुळे यावेळची मालवणची लढत सुरशीची होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघातून नारायण राणे यांना आघाडी मिळाली होती. ही वैभव नाईक यांच्यासाठी चिंतेची बाब समजली जाते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मतदार संघ पुनर्रचनेत मालवण मतदार संघ हा कुडाळ मालवण असे दोन तालुके बनून झाला. या मतदार संघावर 1990 पासून शिवसेनेचे वर्चस्व होते. नारायण राणे यांनी हा आपला गड बनवला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत या गडाला वैभव नाईक यांनी सुरूंग लावला आणि नारायण राणे यांचा तब्बल 10,000 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही वैभव नाईक यांनी ही जागा राखली. यावेळी त्यांच्या समोर राणे कुटुंबातील कोणीही व्यक्ती नव्हती. त्यांनी अपक्ष असलेल्या रणजित देसाई यांचा जवळपास 14,000 हजार मतांनी पराभव केला होता. देसाई यांना नारायण राणे यांनी पाठिंबा दिला होता. तरीही देसाई यांचा पराभव झाला. सलग दोन वेळा या मतदार संघातून वैभव नाईक हे विजयी झाले. त्यामुळे या मतदार संघ नाईक यांच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी आता राणेंनी चंग बांधला आहे. 

ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार

शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मालवण मधून वैभव नाईक यांनाच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. तर हा मतदार संघ आपल्याला मिळावा असे प्रयत्न नारायण राणे यांनी सुरू केले आहेत. या मतदार संघातून निवडणूक लढण्यास माजी खासदार निलेश राणे इच्छुक आहेत. मात्र हा मतदार संघ शिवसेनेचा असल्याने एकनाथ शिंदे तो सोडणार का? हा प्रश्न आहे. लोकसभेला शिंदे यांनी राणेंसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ सोडला होता. त्यात आता विधानसभेला ही ते हा मतदार संघ सोडणार की निलेश राणे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - राजुरा विधानसभेत तिरंगी लढतीत कोणाचा फायदा? धोटे -चटप लढत रंगणार?

नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्गचे खासदार आहेत. जिल्ह्यातील तीन मतदार संघा पैकी एका मतदार संघात शिवसेना शिंदे गट, एका मतदार संघात भाजप आणि एका मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचा आमदार आहे. मालवण मतदार संघ हा राणेंचा मतदार संघ होता. मात्र मागिल दोन निवडणुकीत तिथे शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. राणे सध्या खासदार आहेत. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. राणेंची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. या मतदार संघात निलेश राणे हे संभाव्य उमेदवार असतील. मात्र राणे खासदार, नितेश राणे आमदार असताना निलेश राणे यांना भाजप उमेदवारी देणार का? हा खरा प्रश्न आहे. असं असलं तरी निलेश राणे यांनी मालवणमध्ये प्रचाराला सुरूवात केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

मालवणमध्ये असलेल्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. निवडणुकीतही हा मुद्दा या ठिकाणी गाजण्याची शक्यता आहे. पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईक हे आक्रमक झाले होते. या मतदार संघात नाईक यांनी कायकर्त्यांचे चांगले जाळे विणले आहे. जनसंपर्कही चांगला आहे. ही नाईक यांची जमेची बाजू आहे. तर राणेंची मोठी ताकद या मतदार संघात आहे. शिवाय नाईक हे दोन वेळचे आमदार आहेत. याचाच फायदा राणेंना घेवून मतदार संघात परिवर्तन घडवायचे आहे.  
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
भाजपनंतर राष्ट्रवादीतही खडसेंना नो एन्ट्री? रोहिणी खडसेंचाही पत्ता कट होणार?
मालवण मतदारसंघात वैभव नाईक हॅटट्रिक करणार की राणे पुन्हा गड काबीज करणार?
Dapoli vidhansabha shiv-sena-leader-ramdas-kadam-on- Mahayuti alliance Maharashtra
Next Article
रामदास कदमांची भाषा बदलली, महायुतीबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले जे चुकले ते...