
वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. तसा विरोध त्यांनी या विधेयकावरील चर्चे वेळी जाहीर दर्शवला. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमुल काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या विधेयकाला सभागृहात विरोध दर्शवला. त्यात शिवसेना ठाकरे गटाची भूमीका काय याबाबत उत्सुकता होता. त्यानुसार अरविंद सावंत यांनी पक्षाची भूमीका लोकसभेत मांडली. पण त्यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी या विधेयकाला शिवसेनेचा विरोध की पाठींबा याबाबत आपले पत्ते खोललेच नाहीत. त्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनीही सावंत यांनी छेडले. पण त्यानाही त्याचे उत्तर मिळाले नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना ठाकरे गटाची भूमीका खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली. त्यांनी या विधेयकावर बोलताना भाजपला नक्की काय करायचं आहे असा प्रश्न केला. शिवाय देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काही केलं नाही, ते आज देश चालवत आहेत, असा हल्लोबोल ही त्यांनी भाजपवर केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लीमांनीही बलिदान दिलं आहे.ते ही जेलमध्ये गेले आहेत. याची आठवणही यावेळी सावंत यांनी आपल्या भाषणात करून दिली. सावतं यांच्या भाषणाचा रोख हा विरोधातच होता. पण त्यात हिंदूत्व ही होतं. त्यांनी हिंदू मंदीराच्या देवस्थान कमिटीमध्ये ही गैर हिंदू लोकांना घुसवणार का? असा प्रश्न करत सरकारची कोंडी केली. शिवाय अशा गोष्टींना शिवसेनेचा विरोध राहील असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill: 'वक्फची जमीन सोडा, चीनने किती जमीन हडप केली सांगा' अखिलेश यादव भडकले
त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख हा विरोधात होता. ते या विधेयकाला विरोध करत होते. या विधेयकाबाबत पुन्हा विचार करा अशा सुचनाही ते सरकारला करत होते. पण भाषणाच्या शेवटी ते या विधेयकाला आपला विरोध आहे की पाठिंबा आहे हे स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसं काही केलं नाही. तुमच्या मनात जो राग आहे तो काढा, तुम्हाला खरोखरच मुस्लीम समाजाचं भलं करायचं आहे का त्याचा पुनर्विचार करा असा सल्लाही त्यांनी दिला. पण या विधेयकाला पाठिंबा की विरोध हे मात्र त्यांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाबाबत संभ्रमाची स्थिती कायम आहे.
त्यामुळेच हा संभ्रम दुर व्हावा म्हणून अल्प संख्यांक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी सावंत यांचे भाषण झाल्यानंतर काही प्रश्न उपस्थित केले. सावंत यांनी भाषण केले पण त्यांनी या विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध आहे हे स्पष्ट केले नाही असं रिजीजू म्हणाले. तुम्ही शिवसेनेचे खासदार आहात. याचा आधी मला अभिमान होता. तुमची आक्रमक भाषा आम्हाला आवडायची. पण या भाषणावरून तुमची बोली बदल्याचे दिसले. हा बदल का झाला? काँग्रेस बरोबर गेल्यामुळे तुमच्यात हा बदल झाला का असा बोचरा प्रश्न त्यांनी सावंत यांना केला. पण शेवट पर्यंत शिवसेना ठाकरे गटाची भूमीका काय हे मात्र कुणालाही समजले नाही.
दरम्यान वक्फ बोर्डात दोन गैर मुस्लीम ही असणार आहेत. हे तुम्ही का करत आहात असा प्रश्नही अरविंद सावंत यांनी या निमित्ताने केला. तुमच्या मनात नेमकं काय आहे? पुढे तुम्ही हिंदू मंदीरांच्या देवस्थान समित्यांमध्ये ही गैर हिंदू घेणार आहात का? असा खडा सवाल सावंत यांनी केला. हिंदू मंदीर समित्यांमध्ये तुम्ही जर गैर हिंदू आणणार असाल, तर खबरदार त्याला शिवसेना विरोध करेल असंही सावंत यांनी ठणकावले. हा पायंडा पडणार असेल तर पुढे शिख आणि ख्रिश्चन या धर्मातही तुम्ही हस्तक्षेप करणार आहात का असा सवाल त्यांनी केला. हिंदू मंदीर समित्यांचा मुद्दा पुढे करून शिवसेना ठाकरे गटाने यावेळी सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world