नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा यांच्यावर निसटता विजय मिळवला. त्यानंतर पंकजा यांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण पक्षांने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती किती आहे ते समोर आले आहे. त्यामुळे लोकसभेनंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली की नाही हेही समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंकजा मुंडेंची संपत्ती किती?
पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात ठेवी आहेत. जवळपास 91 लाख 23 हजार 861 रूपयांच्या या ठेवी आहेत. शिवाय शेअर्स आणि म्यूचलफंडमध्ये त्यांनी 1 कोटी 28 लाख 75 हजार 694 रूपयांची गुंतवणूकही केली आहे. त्याच बरोबर पंकजा मुंडे यांच्याकडे 96 लाख 73 हजार 490 लाखाची स्थावर मालमत्ता आहे. तर 6 कोटी 8 लाख 15 हजार 709 रूपये किंमतीची जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज
रोख रक्कम सोने चांदी किती?
पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 84 हजार 530 रूपयांची रोकड आहे. तर 450 ग्राम सोनं त्यांच्याकडे आहे. त्याची किंमत 32 लाख 85 हजार इतकी आहे. तर चार किलो चांदी त्यांच्याकडे आहे. त्याची किंमत जवळपास 3 लाख 28 हजार इतकी आहे. तर इतर दागिने 2 लाख 30 हजार किंमतीचे आहे. तर पतीकडे 200 ग्राम सोने असून त्याची किंमत 13 लाख आहे. शिवाय दोन किलो चांदीही त्यांच्याकडे आहे. त्याची किंमत 1 लाख 38 हजार ऐवढी आहे. इतर दागिने जवळपास दोन लाख रूपयांचे आहेत.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण
मुंडेंवर कर्ज किती?
पंकजा मुंडे आणि त्यांच्या पतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पंकजा मुंडे यांच्या नावावर एकूण 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 चे कर्ज आहे. तर त्यांच्या पतीच्या 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयाचे कर्ज आहे. शिवाय त्यांच्या पतीवर वैयक्तीक कर्ज ही आहे. ते जवळपास 24 कोटी 77 लाख 75 हजार 918 रूपयांचे आहे. त्यामुळे एक प्रकार मुंडे पतीपत्नीवर कर्जाचा डोंगर असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ
उत्पन्नाचे स्रोत काय?
विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तर शेती आणि समाज सेवा हे काम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती आणि माजी विधानसभा सदस्य म्हणून मिळणारे निवृत्तीवेतन हे आहे. शिवाय भाड्या पोटीही त्यांना पैसे मिळतात. हे आपले उत्पन्नाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world