लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच सांगलीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कडेगाव येथील पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करेत केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर सडकून टिका केली. या भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांचं नाव घेतलं. पण त्यांनी यावेळी व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेणे टाळले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव का घेतले नाही याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गांधी घराण्याचे अगदी जवळचे म्हणून ओळखले जात होते. राज्यासह देशातील अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असायचा. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह 23 नेत्यांनी काही वर्षापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. तेव्हा पासून राहुल गांधींच्या गुडबूकमधून चव्हाण बाहेर निघाले आहेत. त्यावेळची चव्हाण यांची भूमिका राहुल गांधी यांना पटली नाही अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. मात्र त्यावेळीही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यासाठी प्रयत्न केले नाहीत. कडेगावच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चव्हाण गांधी कुटुंबापासून दूर गेल्याचं चित्र आहे.
या कार्यक्रमात काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसह तरूण नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी राज्यातल्या शरद पवार,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांचे नाव भाषणाच्या सुरूवातीला घेतले. त्यानंतर त्यांनी सतेज पाटील, खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांचेही नाव घेतले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण ये व्यासपीठावर होते. शिवाय ते पहिल्या रांगेत बसले होते. अशा वेळी चव्हाण यांचे नाव न घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. ज्या वेळी काँग्रेस अडचणीत होती त्यावेळी काही नेत्यांनी पक्ष नेतृत्वा विरोधात भूमिका घेतली होती. त्यात देशातल्या 23 बड्या नेत्यांचा समावेश होता. त्या पैकी एक पृथ्वीराज चव्हाण हे ही होते. त्या कारणानेच चव्हाण यांना राहुल गांधी यांनी टाळले असेही बोलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world