
Balasaheb Thackeray AI Speech :विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षासाठी आता महापालिका निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षानं कामाला सुरुवात केलीय. शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी (16 एप्रिल 2025) नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाइतकीच किंबहूना त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणाची चर्चा होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाळासाहेब ठाकरे यांनी यास AI भाषणात भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना हाक दिली. तसंच शिवसेना सोडून गेलेल्यांना शाब्दिक लाथ दिली.
'हा जो समोर साधा शिवसैनिक बसला आहे तो महत्त्वाच आहे. त्याने तुम्हाला आमदार, खासदार बनवलं. बातम्या सुरुच आहेत. हा गेला, तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरचे दोन-चार केस गळले, उपटले, अरे काय फरक पडतो? आता ही सर्व नवी मंडळी आली.' असं खास ठाकरे शैलीत सुनावलं.
( नक्की वाचा : आज बाळासाहेब असते तर असं भाषण केलं असतं का?' श्रीकांत शिंदेंचा 'उबाठा'ला सवाल )
'बनावटी भाषण'
ठाकरे गटानं बाळासाहेबांचा आवाज वापरून शिवसेनेवरच बाण सोडले. त्यामुळे शिवसेनेनं या भाषणाला बनावटी भाषणाचा दर्जा दिला. बाळासाहेबांचा नकली आवाज देऊन असा वापर केला. त्यांच्या आत्म्याला काय वाटले असेल? तुम्हाला हिम्मत नाही का ? हे बनावट आहेत पर ओरिजनल बाळासाहेब आमच्या सोबत आहेत.शिवसैनिकांनी याचा निर्णय विधानसभेत दिला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
तर, 'बाळासाहेब हयात असताना त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, शिवसेना जेव्हा काँगेससोबत जाईल तेव्हा माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, आम्हाला खरं काल हे ऐकायचं होतं. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसले आहेत, त्या काँग्रेसला आम्ही सोडलं हा विचारांचा निर्धार होईल असं आम्हाला वाटत होतं. पण AI च्या माध्यमातून बाळासाहेबांचं जे भाषण दाखवलं गेलं, त्यातून एककलमी शिंदे साहेबांवर टीका झाली, नरेंद्र मोदीजींवर, देवेंद्रजींवर टीका झाली, अनैसर्गिक भाषण दाखवून महाराष्ट्राच्या जनतेवर काहीही परिणाम होणार नाही,' असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Mumbai BJP : फडणवीसांच्या निकटवर्तीयाला मुंबईचा अध्यक्ष करण्यास भाजपामधूनच विरोध? काय आहेत कारणं? )
ठाकरे गटानं बाळासाहेबांचा आवाज वापर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यावर टीका केली. त्याला भाजपानंही उत्तर दिलं. 'बाळासाहेब महान व्यक्ती त्यांची स्टाईल भाषण केवळ राजकीय फायद्यासाठी वापरली जाक आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विरोधाभास होता.हिंदुत्व विचार एआय माध्यमातून विचार सांगावं लागण्याचा वेळ. त्यांनी वीर सावरकर यांचा अवमान कसा केला, वक्फ बोर्ड विरोधात मतदान केले,' अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
AI भाषण किती मार्मिक ठरेल?
बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकणे म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणी असायची. विरोधकही त्यांचे भाषण ऐकायचे. आपल्या समोर बसलेल्या शिवसैनिकांना नेमकं काय हवंय हे बाळासाहेबांना पक्कं माहिती असायचं. ते जेव्हा बोलायचे तेव्हा मनापासून आणि उत्स्फुर्तपणे बोलायचे. ते बोलत असताना शिवसैनिक घोषणा द्यायचे काहीतरी बोलायचे, ते बाळासाहेब काहीतरी बोलायचे ज्यामुळे टाळ्यांचा कडकडाट व्हायचा किंवा हशा पिकायचा. सोशल मीडिया हा इंटरॅक्टीव्ह म्हणजेच आंतरसंवादी आहे, बाळासाहेबांना हे गमक फार पूर्वीच कळालं होतं.
( नक्की वाचा : 'बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला.. AI भाषणावर शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय? )
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थ्रीडी व्हर्च्युअल सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकाचवेळी 100 ठिकाणी मार्गदर्शन करणारी मोदींची छबी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राजकारण बदलत असून आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड देण्याचा प्रयत्न केला तर प्रचार प्रभावी होऊ शकतो असे अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र एखाद्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नेता तुमच्यासमोर उभा राहील असे सांगून प्रत्यक्षात नेत्याच्या आवाजातील एखादा व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो फसण्याची शक्यता असते.
आता बाळासाहेबांचे AI भाषण या पातळीवर किती 'मार्मिक' ठरलं हे या प्रयोगाची पुनरावृत्ती किती होणार? तसंच याचा ठाकरे पक्षाच्या संघटनेत आणि मतांमध्ये किती फरक होणार यावरच अवलंबून असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world