जाहिरात

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेची सत्ता गेली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणते पर्याय?

मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वाचा इनसाईड स्टोरी..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिकेची सत्ता गेली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणते पर्याय?
Uddhav Thackeray Shivsena UBT BMC Election Result
मुंबई:

Shivsena UBT BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप (88), शिवसेना-UBT (73), शिवसेना (29), काँग्रेस (18) आणि मनसे (10) जागांवर आघाडीवर आहे. बीएमसीचा निकाल हा भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना गड राखण्यात अपयश आलंय. मुंबईतील 'मराठी माणूस' हा मु्द्दा ठाकरेंनी उचलून धरला होता. परंतु, आता या निवडणुकीत ठाकरे पराभूत झाल्याने त्यांच्या समोर कोणते पर्याय असणार आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला. पण या निवडणुकीत शिवसेना यूबीटीला अपेक्षित यश मिळालं नाही.

BMC सत्ता गेली, शिवसेना (UBT) साठी मोठा धक्का

मुंबई महापालिकेची सत्ता जाणे हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी मोठा धक्का आहे. मागील दोन दशकांपासून बीएमसीवर शिवसेनेचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालंय. शिवसेनेचा नेहमीच बीएमसीवर दबदबा राहिला आहे. मित्रपक्षांसोबत युती करून शिवसेना बीएमसीवर सत्तेत यायची.

नक्की वाचा >> नवी मुंबईत टांगा पलटी अन् घोडे फरार, भाजपच्या बाजूने निकाल लागताच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा व्हिडीओ व्हायरल

ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदेंना झटका

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मुंबईतील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतु, या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जास्त जागा जिंकून शिंदेंना झटका दिला. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचीच शिवसेना खरी असल्याचा कौल या निवडणुकीत दिला आहे.

राज ठाकरेंच्या मनसेचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. मनसे फक्त 10 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीचा विस्तार करणं उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. 'मी मुंबईकर'सारखे अनेक चळवळी उद्धव ठाकरेंनी राबवल्या आहेत. त्यामुळे ते शिवसेनेचा विस्तार मुंबईच्या बाहेरही करण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> BMC Elections : निशिकांत दुबे राज ठाकरेंची भेट घेणार, 'पटक-पटक कर मारूंगा' चॅप्टर संपवणार, ट्वीटमुळे खळबळ!

उद्धव ठाकरे कसं वाढवणार मतदारवर्ग?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसलाही मोठं यश मिळालं नाही. काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना पक्षवाढीसाठी मराठी मतदारांसोबतच मुस्लिम मतं आपल्या बाजूने फिरवावी लागतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com