जाहिरात

Sanju Samson : खतरनाक ! एका बॉलमध्ये 13 रन, आशिया कपपूर्वी संजू सॅमसनची जबरदस्त कामगिरी

Sanju Samson : टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) त्याचा धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे.

Sanju Samson : खतरनाक ! एका बॉलमध्ये 13 रन, आशिया कपपूर्वी संजू सॅमसनची जबरदस्त कामगिरी
Sanju Samson : संजू सॅमसननं आशिया कपपूर्वी सर्व टीम्सना इशारा दिला आहे.
मुंबई:

Sanju Samson : टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) त्याचा धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे. मंगळवारी कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना त्याने स्पर्धेतील त्याच्या तिसऱ्या सामन्यात धमाकेदार आणि वेगवान हाफ सेंच्युरी झळकावली. तिरुवनंतपुरममध्ये थ्रिसूर टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संजूने 46 चेंडूंमध्ये 89 धावांची शानदार खेळी केली, ज्यात चार फोर आणि नऊ सिक्सचा समावेश होता. त्याने 193 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे संघाला 20 ओव्हर्समध्ये 188/7 अशी धावसंख्या उभारता आली. टायटन्सकडून अजिनास के (5/30) ने पाच विकेट्स घेतल्या.

1 बॉलमध्ये 13 रन्स

संजू सॅमसननं पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर स्पिनर सिजोमोन जोसेफने नो-बॉल टाकल्यानंतर एकाच बॉलवर 13 रन्स काढले. त्याने नो-बॉलवर कव्हरच्या दिशेने सिक्स लगावला. त्यानंतर फ्री-हिटवरही सॅमसनने पुन्हा चेंडू स्टँड्समध्ये पाठवला.

फक्त दोन दिवसांपूर्वी, संजू त्याच्या पहिल्या सामन्यात मधल्या फळीत 22 चेंडूंमध्ये 13 धावा काढून अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याने एरीस कोल्लम सेलर्सविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. त्याने 51 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 7 षटकांसह 121 धावांची धडाकेबाज खेळी केली. यामुळे त्याच्या संघाने प्रतिस्पर्धकांनी दिलेल्या 237 धावांचा डोंगर यशस्वीपणे पार केला. त्या सामन्यात विरोधी संघाने 236/5 धावा केल्या होत्या, ज्यात यष्टीरक्षक-फलंदाज विष्णू विनोदने 41 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 94 धावा केल्या होत्या, तर कर्णधार सचिन बेबीने 44 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि सहा षटकारांसह 91 धावांची स्फोटक खेळी केली होती.

( नक्की वाचा : Sanju Samson : संजू सॅमसनसोबत धोका, टीममध्ये निवड पण Playing 11 मध्ये जागा नाही ! कारणही उघड )
 

आता तीन सामन्यांत, सॅमसनने 74.33 च्या सरासरीने आणि 187 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने 223 धावा केल्या आहेत, ज्यात प्रत्येकी एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

भारतासाठी 42 T20I सामन्यांच्या कारकिर्दीत सॅमसनने 38 इनिंगमध्ये 25.38 च्या सरासरीने 861 रन्स केले आहेत. ज्यात तीन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी आहेत. गेल्या वर्षापासून त्याला सलामीवीर म्हणून एक नवीन संधी मिळाली आहे, आणि बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने पाच इनिंगमध्ये तीन सेंच्युरी झळकावली आहेत. गेल्या वर्षी तो भारताचा सर्वोत्तम T20I फलंदाज ठरला होता. त्याने 12 डावांमध्ये 43.60 च्या सरासरीने आणि 180.16 च्या स्ट्राइक रेटने 436 रन्स केल्या होत्या, ज्यात तीन सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी होती.

संजूचे भारतासाठी पुढील आव्हान आशिया कप असणार आहे. भारत 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, तर पाकिस्तानविरुद्धचा हाय-व्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही सामने दुबईमध्ये खेळवले जातील. भारत आपला शेवटचा गट टप्प्यातील सामना 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध अबू धाबी येथे खेळेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com