AFG vs NZ Greater Noida Test Match Called Off: अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच अखेर शुक्रवारी रद्द झाली. मॅचचा शेवटचा दिवसही एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला. एकही बॉल न टाकता टेस्ट मॅच रद्द झाल्याची भारतामधील ही पहिली घटना आहे. भारतानं 1933 साली पहिल्यांदा टेस्ट मॅचचं यजमानपद भूषवलं होतं. 91 वर्षांच्या इतिहासात एकही बॉल न टाकता रद्द झालेली ही पहिली टेस्ट मॅच आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आशिया खंडातही यापूर्वी फक्त एक मॅच या पद्धतीनं रद्द झाली होती. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात 1998 मधील फैसलाबाद टेस्ट या पद्धतीनं रद्द झाली होती. जगात यापूर्वी फक्त 7 टेस्ट मॅच या पद्धतीनं रद्द झाल्या होत्या. ही आठवी टेस्ट आहे.
गेल्या आठवड्यात सतत झालेल्या पावसामुळे ग्रेटर नोएडामधील आऊटफिल्ड ओले झाले होते. पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं पहिले दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही.
( नक्की वाचा : दमदार सेंच्युरीसह प्रकट झाला इशान किशन! निवड समितीची वाढवली डोकेदुखी )
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) या टेस्ट मॅचचं यजमान होतं. अफगाणिस्तानमधील अशांत परिस्थितीमुळे ही मॅच भारतामध्ये होणार होती. बीसीसीआयनं या टेस्टसाठी ग्रेटर नोएडा, कानपूर आणि बंगळुरु हे तीन पर्याय दिले होते. त्यापैकी एसीबीनं ग्रेटर नोएडाची निवड केली. अन्य दोन ठिकाणी दुलिप ट्रॉफीचे सामने होणार असल्यानं एसीबीनं ग्रेटर नोएडाला पसंती दिली होती.
ही टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हती. पण, आगामी श्रीलंका आणि भारत सीरिजपूर्वी सरावाची चांगली संधी न्यूझीलंडला मिळणार होती. अफगाणिस्ताननं या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका आयर्लंड विरुद्ध दोन-दोन टेस्ट खेळले होते. त्यांची टीम 2021 पासून टेस्ट मॅचमध्ये विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world