जाहिरात
Story ProgressBack

T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर, दिग्गज खेळाडूला वगळलं

Australia's T20 World Cup squad:  टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर झाली आहे.

Read Time: 2 min
T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर, दिग्गज खेळाडूला वगळलं
ऑस्ट्रेलियानं 3 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला टीममधून वगळलं आहे.
मुंबई:

Australia's T20 World Cup squad:  टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर झाली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी टेस्ट आणि वन-डे प्रकारात जागतिक अजिंक्यपद मिळवलंय. पण, टी20 वर्ल्ड कपसाठी कमिन्स नाही तर मिच मार्श कॅप्टन असेल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात ही स्पर्धा होणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनुभवी डेव्हिड वॉर्नरला या टीममध्ये जागा मिळालीय. पण, दिग्गज खेळाडू स्टिव्ह स्मिथला बाहेर ठेवण्यात आलंय. 2015 आणि 2023 मधील वन-डे वर्ल्ड कप तसंच 2021 मधील T20 वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियन टीमचा स्मिथ सदस्य होता.  त्याचबरोबर सध्याच्या आयपीएल सिझनमध्ये कमाल करत असलेल्या जेक फ्रेजर-मॅकगर्कलाही टीममध्ये जागा मिळालेली नाही.  

ऑस्ट्रेलियाची T20 वर्ल्ड कप टीम  :  (Australia's T20 World Cup squad): मिच मार्श (कॅप्टन), एश्टन एगर, पॅच कमिन्स, टीम डेव्हिल, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा

( नक्की वाचा : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती )

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 20 टीम सहभागी होणार आहेत. 1 जून ते 29 जून दरम्यान ही सर्धा खेळली जाईल. सर्व 20 टीमची विभागणी 4 ग्रुपमध्ये करण्यात आलीय. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 टीम आहेत. सर्व ग्रुपमधील टॉप 2 टीम सुपर 8 मघ्ये दाखल होतील. सुपर 8 मधील टीमची 4-4 च्या ग्रुपमध्ये विभागणी होईल. सुपर 8 मधील दोन्ही गटातील टॉप 2 टीम सेमी फायनलमध्ये जातील. दोन्ही सेमी फायनल जिंकणाऱ्या टीममध्ये फायनल लढत होईल. 

वर्ल्ड कप ग्रुप (ICC T20 World Cup 2024 league stage groups)

ग्रुप ए - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ग्रुप बी - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
ग्रुप सी - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापूआ न्यू-गिनी
ग्रुप डी - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination