
ICC Champion's Trophy 2025: सध्या पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला पहिल्या दिवशीपासूनच वादाची किनार लागली आहे. या स्पर्धेच्या उद्घान सोहळ्याला पाकिस्तानने भारतीय संघाला डिवचवण्याचा प्रयत्न केला. कराचीमधील राष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानकडून सर्व देशांचे झेंडे फडकवण्यात आले मात्र भारताचा झेंडा नसल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने आपली चूक सुधारली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय ध्वज दिसत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सर्व स्तरातून टीका झाली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या इतर संघांच्या ध्वजासोबत भारतीय ध्वज दिसत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये तिरंगा नसल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने देशात खेळण्यास नकार दिल्याबद्दल भारतीय संघाविरोधात मुद्दाम राग काढला असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चौफेर (पीसीबी) टीका झाली. त्यानंतर आता अखेर पाकिस्तानने आपली चूक सुधारली आहे.
India's flag raised at the National Stadium in Karachi. What a moment 🇵🇰🇮🇳♥️♥️
— Farid Khan (@_FaridKhan) February 18, 2025
We have big hearts, we don't do cheap acts. All 7 Indian journalists granted Pakistan visas too 🤗 #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/zWfIMCaVex
आज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना सुरू झाला तेव्हा स्टेडियममध्ये भारतीय तिरंगा फडकताना दिसला. त्याचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. कराचीमध्ये तिरंगा फडकताना पाहून भारतीय चाहते खूप आनंदी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world