घरच्या मैदानावर गुजरातचं पानिपत, दिल्लीचा सफाईदार विजय

जाहिरात
Read Time: 2 mins
घरच्या मैदानावर गुजरातचं पानिपत, दिल्लीचा सफाईदार विजय
गुजरात:

आयपीएलचे सामने दिवसेंदिवस रोंमांचक होत चालले आहेत. कधी रेकॉर्डतोड परफॉर्मन्स पाहायला मिळतात तर कधी चुरशीचे सामने पाहायला मिळतात. अशातच काल झालेली दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्सची मॅच. कमी स्कोरची ही मॅच गुजरातला महागात पडली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने ओव्हर ठेवत, विकेट ठेवत कमी वेळात गुजरात टायटन्सला त्यांच्याच मैदानावर 20 ओव्हरच्या आत गुंडाळत पराभूत केले. 

दिल्ली कॅपिट्ल्सने आधी टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर गुजराला 20 ओव्हरही खेळू दिलं नाही. दिल्लीने गुजरातला 17.3 ओव्हरमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी फक्त 90 धावांची गरज होती. दिल्लीने हे आव्हान सहजासहजी पूर्ण केलं. दिल्लीने 90 धावांचं आव्हान 8.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 4 बाद 92 धावा केल्या. दिल्लीचा आयपीएलमधील हा बॉल्सच्या हिशोबाने सर्वात मोठा विजय ठरला आहे. पंतने चांगल्या कर्णधाराव्यतिरिक्त, पंतने विकेटच्या मागे चपळता दाखवली आणि दोन स्टंपिंग आणि दोन कॅचही घेतल्या. दिल्लीने बॉलिंगचा उत्तम वापर करत गुजरात टायटन्सला त्यांच्याच मैदानावर 89 धावांत गुंडाळले. 

गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक 31 धावांची खेळी खेळली. त्यामुळे गुजरातला 89 धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र राशिद व्यतिरिक्त एकालाही निर्णायक खेळी करता आली नाही. तर आजवर कॅप्टन शुबमन गिल अहमदाबादच्या स्टेडियममध्ये कायम तोडफोड खेळी खेळत आला आहे. मात्र दिल्ली विरुद्ध शुबमन फ्लॉप ठरला. शुबमनला फक्त 8 धावाच करता आल्या. गुजरातच्या या पराभवानंतर कॅप्टन शुबमन गिल याने काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात. 

शुबमन गिल काय म्हणाला?

“आमची फलंदाजी खूपच सरासरी होती. आता पुढे जायचंय आणि जोरदार कमबॅक करणं हे महत्त्वाचं आहे. पीच ठिक होती. काही विकेट पाहिले तर त्यात पीचचा काहीच संबंध नव्हता. चुकीचे शॉट सिलेक्शन होतं. तसंच आमचा हा स्पर्धेतील अर्धा टप्पा आहे. आम्ही 3 सामने जिंकलो आहोत. आमचे 7 सामने बाकी आहेत. या 7 सामन्यांपैकी आम्ही 5-6 सामने जिंकू,” अशी आशा शुबमन गिलने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान व्यक्त केला.

Advertisement