जाहिरात

IND vs SL : श्रीलका सीरिजसाठी रोहित, विराट, बुमराहला विश्रांती, कोण होणार कॅप्टन ?

India tour of Sri Lanka : झिम्बाब्वेनंतर भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये वन-डे आणि टी20 सामन्यांचा समावेश आहे.

IND vs SL : श्रीलका सीरिजसाठी रोहित, विराट, बुमराहला विश्रांती, कोण होणार कॅप्टन ?
IND vs SL ODI Series
मुंबई:

India tour of Sri Lanka :  टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीम सध्या झिम्बाब्वे विरुद्ध सीरिज खेळत आहे. या सीरिजसाठी भारतीय टीममधील सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय टीममध्ये आयपीएल गाजवलेल्या तरुण खेळाडूंचा समावेश आहे. झिम्बाब्वेनंतर भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या सीरिजमध्ये वन-डे आणि टी20 सामन्यांचा समावेश आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजसाठीही रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

36 वर्षांच्या रोहित शर्मानं सहा महिन्यांपासून ब्रेक घेतलेला नाही. तो डिसेंबर-जानेवारी महिन्यातील दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजपासून सतत खेळत आहे. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धची टी20 सीरिज, इंग्लंड विरुद्धची टी20 सीरिज, आयपीएल आणि टी20 वर्ल्ड कप रोहित खेळलाय. बीसीसीआयच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 'चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध होणारी 3 वन-डे सामन्यांची सीरिज तयारीसाठी पुरेशी आहे. पुढील दोन महिने रोहित आणि विराट टेस्ट क्रिकेटला प्राधान्य देतील. भारत सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात 10 टेस्ट खेळणार आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण होणार कॅप्टन?

'इंडियन एक्स्प्रेस'मधील रिपोर्टनुसार श्रीलंका विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी हार्दिक पांड्या किंवा केएल राहुल कॅप्टन होऊ शकतो. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या तीन मॅचची वन-डे सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये रोहित खेळला नाही तर हार्दिक पांड्या कॅप्टन होण्याची दाट शक्यता आहे. हार्दिकनं टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 

( ट्रेंडींग न्यूज : कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल? दोघांमध्ये किती आहे वयाचं अंतर, कुणाची कमाई जास्त? )
 

विराटचा सहभागही अनिश्चित

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली सध्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये विराट खेळण्याची शक्यता कमी आहे. 

Latest and Breaking News on NDTV

भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक (India tour of Sri Lanka, 2024)


27 जुलै- पहली T20- 7:00 PM
28 जुलै- दूसरी T20- 7:00 PM
30 जुलै- तिसरी T20-7:00 PM

वन-डे सीरिज
2 ऑगस्ट- पहली वनडे- 2:30 PM
4 ऑगस्ट - दूसरी वनडे- 2:30 PM
7 ऑगस्ट- तिसरी वनडे- 2:30 PM

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com