India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची पहिली इनिंग अवघ्या 46 रन्सवर ऑल आऊट झाली. या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा कोणताही फायदा टीम इंडियाला घेता आला नाही. मॅट हॅन्री आणि
विल्यम ओ'रुर्के यांच्या फास्ट बॉलिंगपुढं भारतीय बॅटर्सचा निभाव लागला नाही. टीम इंडियाची पहिली इनिंग फक्त 46 रनवर आऊट झाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाच जण शून्यावर आऊट
टीम इंडियाचे पाच बॅटर पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाले. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या पाच जणांना खातंही उघडता आलं नाही. ऋषभ पंतनं सर्वाधिक 20 रन काढले. तर यशस्वी जैस्वालनं 13 रन केले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही भारतीय बॅटरला दोन अंकी रन करता आले नाहीत.
New Zealand on a tear in Bengaluru! 👀#INDvNZ 📝 https://t.co/WDUnLWUH8q#WTC25 pic.twitter.com/PmYDpE93qO
— ICC (@ICC) October 17, 2024
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. विल्यम ओ'रुर्केनं 4 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. तर टीम साऊदीनं 1 विकेट घेतली.
लाजीरवाण्या रेकॉर्ड्सची नोंद
टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधील हा तिसऱ्या क्रमांकाचा निचांकी स्कोअर आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा सर्वात कमी स्कोअर आहे. यापूर्वी 1976 साली वेलिंग्टन टेस्टमध्ये टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 81 रनवर ऑल आऊट झाली होती. हा निचांकी स्कोअर यंदा टीम इंडियानं मागं टाकला आहे.
( नक्की वाचा : IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर )
टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधील निचांकी स्कोअर 36 आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020 साली अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय टीमनं हा लज्जास्पद रेकॉर्ड केला होता. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 1974 साली लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये भारतीय टीम 42 रनवर ऑल आऊट झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world