
Devendra Fadnavis on Rohit Sharma : टीम इंडियाचा दिग्गज बॅटर रोहित शर्माचं नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला देण्यात आलं आहे. वानखेडेवर झालेल्या खास कार्यक्रमात रोहित शर्मा स्टँडचं (Rohit Sharma) अनावरण करण्यात आलं. रोहित प्रमाणेच टीम इंडियाचे दिवंगत कॅप्टन अजित वाडेकर (Ajit Wadekar Stand) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Stand) अनावरणही आज ( गुरुवार, 16 मे 2025) झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना रोहित शर्माकडं खास मागणी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्र्यांनी या भाषणात रोहित शर्माच्या कामगिरीचा गौरवानं उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले की, रोहित शर्माबद्दल आपण काय बोलायचं, ते मैदानात आल्यानंतर त्यांच्या बॅटिंगनं मैदान दणाणून सोडतात. त्यांनी सलग दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारताला जिंकून दिल्या. आपल्या अपूर्ण इच्छा त्यांच्या कॅप्टनसीमध्ये पूर्ण झाल्या.
त्यांचं मैदानावरील वागणं मोकळं असतं. त्यामुळे त्यांनी वेगळी प्रतिमा केली आहे. भारताच्या सर्वोत्तम कॅप्टनच्या यादीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे मला कळालेच नाही. आता रोहित शर्मानं मारलेला फटका हा रोहित शर्मा स्टँडला कधी लागतो, याची आम्ही वाट पाहत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
( नक्की वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक! वानखेडेवर मुख्यमंंत्र्यांची जोरदार बॅटिंग )
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्टँडला देण्याचा MCA च्या इतिहासातील हा दुर्मीळ क्षण आहे. या सन्मानासाठी रोहित पात्र आहे. यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईकरांना नवं स्टेडियम
मुंबईकरांसाठी एक लाख प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारचं सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यंंत्र्यांनी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world