Asia Cup : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आशिया चषक धोक्यात; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बीसीसीआयने पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कपमधून माघार घेण्याच्या निर्णयाची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) दिल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Asia Cup : भारत-पाकिस्तान तणावामुळे आशिया चषक होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळला जाणार आहे. मात्र भारत या स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेऊ शकतो. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की भारतीय संघ आशिया कपचा भाग राहणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याबद्दल घोषणा करेल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बीसीसीआयने पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कपमधून माघार घेण्याच्या निर्णयाची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) दिल्याची माहिती आहे. एसीसीचे नेतृत्व सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी करत आहेत, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष देखील आहेत.

(नक्की वाचा- KL Rahul Century: केएल राहुलची 'क्लास' शतकी खेळी! किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला)

रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेटला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. भारतीय संघ पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. ही देशाची भावना आहे. स्पर्धांमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या स्पर्धांमध्ये आमचा भविष्यातील सहभाग देखील थांबवण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारशी सतत संपर्कात आहोत", असं बीसीसीआयने कळवलं आहे. 

( नक्की वाचा :  इंग्लंड दौऱ्यासाठी India A टीमची घोषणा, यशस्वी जैस्वाल नाही तर 'हा' खेळाडू आहे कॅप्टन ! )

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या आशिया कपवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश असलेली ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय भविष्यात घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला माहिती आहे की आशिया कपचे आयोजन भारताशिवाय शक्य नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे बहुतेक स्पॉन्सर्स भारतातील आहेत. याशिवाय, भारत स्पर्धेत सहभागी न झाल्यामुळे, प्रसारकांचा आशिया कपमधील रसही कमी होईल. 

Advertisement
Topics mentioned in this article